Join us
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीवरून पडले रामदेवबाबा; व्हायरल व्हिडीओवर फराह खान अलीने अशी दिली प्रतिक्रिया

By रूपाली मुधोळकर | Updated: October 14, 2020 16:42 IST

तोल गेला अन्..., व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देफराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ आहे, योगगुरु रामदेवबाबांचा. तर या व्हिडीओत रामदेवबाबा चक्क हत्तीवर बसून योग करताना दिसतात. याचदरम्यान हत्ती जरा हालचाल करतो आणि हत्तीवर बसून योग करणारे रामदेवबाबा खाली पडतात.  बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोबत यावरच्या कमेंटही. बॉलिवूड अभिनेते संजय खान यांची लेक फराह खान अली हिनेही या व्हिडीओवर यावर कमेंट केली आहे.

‘पाठीच्या कण्याला होणारी दुखापत खूप गंभीर असते. ते लवकर बरे होतील, अशी आशा करते,’ असे ट्विट फराह खान अली हिने केले.फराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे. अनेकदा ती राजकीय मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते. हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान ही फराहची बहीण. अभिनेते फिरोज खान तिचे काका आहेत तर अभिनेता फरदीन खान चुलत भाऊ आहे.

तोल गेला अन् पडले...

रामदेव बाबांचा हा व्हिडीओ  सोमवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे.  ते मथुरामधील रमणरेती आश्रममध्ये संतांना योग शिकवत होते, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी योग गुरु बाबा रामदेव यांनी महावन रामानरती येथील कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमातील संतांना योग शिकविला. यावेळी व्यासपीठावर गुरु शरणानंद महाराजांनीही बाबा रामदेव यांच्यासोबत योग केला. यावेळी बाबा रामदेव यांनी हत्तीवर बसून योगासने केली. यादरम्यान एक व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. जो सुमारे 22 सेकंदांचा आहे. ज्यामध्ये बाबा रामदेव हत्तीवर बसून योगासने करत आहेत. मात्र, अचानक हत्तीने हालचाल केली. त्यावेळी बाबा रामदेव यांचा तोल गेल्यामुळे आणि ते हत्तीवरून खाली पडले. मात्र, यावेळी त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

टॅग्स :रामदेव बाबा