Honey Singh: आपल्या म्युझिकने देशभरातच नव्हे, तर जगभरात नाव कमावणारा प्रसिद्ध रॅपर आणि गायक म्हणजे हनी सिंह. त्याच्या रॅपवर जवळपास सगळ्यांनीच ताल धरला असेल. अंग्रेजी बीट, लुंगी डान्स यांसारख्या भांगडा हिप-हॉप गाण्यांसाठी लोकप्रिय असलेल्या हनी सिंगचे देशात लाखो चाहते आहेत. हनीचे 'लुंगी डान्स' हे गाणे अक्षरशः लोकांच्या जिभेवर रुळले. रॅपर हनी सिंग त्यांच्या गाण्यांव्यतिरिक्त अनेकदा त्याच्या कॉन्सर्टमुळे देखील तितकाच चर्चेत असतो. अलिकडेच २८ मार्च रोजी त्याने वांद्रे येथे त्याचा कॉन्सर्ट पार पडला.मात्र एकीकडे सगळं काही सुरळित सुरु असताना त्याच्या कॉन्सर्टमध्ये अचानक गोंधळ निर्माण झाला.दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्याचा हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, रॅपर हनी सिंहचा त्याच्या ‘माय स्टोरी – इंडिया चॅप्टर’ दौऱ्याचा भाग म्हणून शनिवार, २८ मार्च रोजी मुंबईत परफॉर्म करत होता. ही कॉन्सर्ट वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हनी सिंहने ‘डोप शॉप’, ‘ब्लू आईज’, ‘ब्राऊन रंग’, ‘मिलियनेअर’, ‘देसी कलाकार’ आणि ‘लुंगी डान्स’ यांसारख्या हिट गाणी गायल्याने चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला.या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसत आहेत, पण याच दरम्यान एका महिला चाहतीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, जी बंद गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जेव्हा बॉडीगार्ड्सने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली आणि ती चाहती आरडाओरडा करून शिवीगाळ करू लागली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उशिरा पोहोचल्यामुळे अनेक लोकांना प्रवेश नाकारण्यात आला, ज्यामुळे काही चाहते संतप्त झाले. दरम्यान, एका महिलेने प्रवेशद्वार ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.लक्षवेधी बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ हनी सिंगने स्वतःत्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना या रॅपरने त्या चाहतीला 'शेरनी' असं म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या प्रकरणाची आणखी चर्चा होऊ लागली आहे.
Web Summary : A Honey Singh concert in Mumbai turned chaotic when a female fan, denied entry for being late, climbed the gate and verbally abused security. The incident, captured on video, went viral, raising questions about event management. Honey Singh himself shared the video, calling the fan a 'lioness'.
Web Summary : मुंबई में हनी सिंह के कॉन्सर्ट में एक महिला फैन को देर से आने के कारण एंट्री नहीं मिली, जिसके बाद उसने गेट पर चढ़कर सुरक्षाकर्मियों को गालियां दीं। वीडियो वायरल होने पर इवेंट मैनेजमेंट पर सवाल उठे। हनी सिंह ने वीडियो शेयर कर फैन को 'शेरनी' कहा।