Join us

मोदी सरकारला निवडणूक जिंकायची असेल तर..; यामी गौतमच्या पतीचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:28 IST

आर्टिकल 370 च्या ट्रेलर लॉंचला यामीच्या नवऱ्याने मोदी सरकारबद्दल मोठं विधान केलंय

'आर्टिकल 370' (Article 370) सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. काल सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. या ट्रेलर लॉंचला अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि तिचा नवरा अन् सिनेमाचा निर्माता आदित्य धर (Aditya Dhar)  उपस्थित होते. याच सोहळ्याला यामी गरोदर असल्याची बातमी सर्वांना समजली. आदित्य बायकोची काळजी घेताना दिसला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यामीच्या नवऱ्याने अर्थात आदित्यने २०२४ ची लोकसभा निवडणूक अन् मोदी सरकारबद्दल भविष्यवाणी केली. काय म्हणाला आदित्य?

आदित्यने २०१९ साली 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचं खुप कौतुक झालं. आता 'आर्टिकल 370'  द्वारे आदित्य निर्मितीची धूरा सांभाळत आहे. यावेळी ट्रेलर लॉंचला आदित्य म्हणाला, "सध्या असलेल्या सरकारला निवडणुका जिंकण्यासाठी माझ्या सिनेमाची गरज नाही. त्यांनी आपल्यासाठी राम मंदिराची निर्मिती केलीय. 

आदित्य पुढे म्हणाला, "सध्याच्या सरकारला मतं मिळवण्यासाठी माझ्या सिनेमाची गरज नाही.  या सिनेमाची निर्मिती करण्यामागे माझा उद्देश स्वच्छ आहे.  कोणता सिनेमा एका ठराविक विचारधारेला सपोर्ट करतो आणि कोणता नाही, हे प्रेक्षकांना चांगलंच माहित आहे. ज्यावेळी माझा उद्देश वेगळा होईल त्यावेळी मी सिनेमे बनवणं सोडून देईल." 'आर्टिकल 370' सिनेमा २३ फेब्रुवारीला रिलीज होतोय. 

 

टॅग्स :यामी गौतमकलम 370नरेंद्र मोदी