Join us

तू ड्रग्ज घेतेस का? चाहत्याने विचारला थेट प्रश्न, यामीने असे दिले उत्तर

By रूपाली मुधोळकर | Updated: October 11, 2020 17:51 IST

‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान एका चाहत्याने यामीला थेट ड्रग्जबद्दल प्रश्न केला.

ठळक मुद्देनुकताच यामीचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हा नवा चित्रपट रिलीज झाला आहे. तिचे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर ग्लॅमर इंडस्ट्रीतील प्रत्येकाकडेच संशयाच्या नजरेतून पाहिले जातेय. आता यामी गौतम हिचेच उदाहरण घ्या. ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान एका चाहत्याने यामीला थेट ड्रग्जबद्दल प्रश्न केला. तू ड्रग्ज घेतेस का? असा थेट प्रश्न या चाहत्याने यामीला केला. यामीनेही यावर थेट प्रत्युत्तर दिले.तर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमध्ये एका चाहत्याने यामीला थेट तू ड्रग्ज घेतेस का? असा सवाल केला. इतकेच नाही तर हा प्रश्न विचारण्यामागचे कारणही या चाहत्याने सांगितले. पब्लिक प्लॅटफॉर्मवर असा थेट प्रश्न विचारणे मूर्खपणा आहे, हे मला माहित आहे. पण तू ड्रग्ज घेत असशील तर मी दुखावला जाईल. चाहत्यांसाठीच एकदा ‘नाही’ म्हण, असेही या चाहत्याने लिहिले.

‘नाही, मी ड्रग्ज घेत नाही. मी अंमली पदार्थाचा विरोध करते, कोणीही अंमली पदार्थांचे सेवन करू नये,’ असे उत्तर यामीने दिले. तिचे हे टिष्ट्वट सध्या चांगलेच व्हायरल होतेय.

तर आयएएस अधिकारी झाले असते...‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमध्ये यामीला आणखी काही इंटरेस्टिंग प्रश्न चाहत्यांनी विचारलेत. तुला सर्वाधिक आवडलेला तुझा सिनेमा कोणता? असा सवाल एका चाहत्याने केले. यावर यामीने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाचे नाव घेतले. आवडते किक्रेपटू कोणते? असे विचारले असता यामीने एमएस धोनी, राहुल द्रविड यांची नावे घेतली. आवडते स्ट्रिट फूड कोणते? यावर पापडी चाट असे तिने सांगितले.अभिनेत्री झाली नसतीस तर काय? यावर अभिनेत्री झाले नसते तर आयएएस अधिकारी झाले असते, असे उत्तर यामीने दिले.

नुकताच यामीचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हा नवा चित्रपट रिलीज झाला आहे. तिचे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात भूत पुलिस आणि अ थर्सडे य दोन सिनेमाचा समावेश आहे. ‘अ थर्सडे’ या सिनेमात यामी नैना जयस्वाल नामक एका प्लेस्कूल टीचरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

यामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन

चाहत्याचा अपमान करणे यामी गौतमच्या अंगलट, वाचा काय आहे प्रकरण

टॅग्स :यामी गौतम