Join us

ओवाळीते भाऊराया...! बॉलिवूडमधील भाऊ-बहिणीची जोडी...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 12:27 IST

आज भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. बंधू-भगिनींच्या मायेच्या ओलाव्याचा हा दिवस. भावा बहिणीतील नात्यातले प्रेम साजरे ...

आज भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. बंधू-भगिनींच्या मायेच्या ओलाव्याचा हा दिवस. भावा बहिणीतील नात्यातले प्रेम साजरे करण्यासाठी घराघरात भाऊबीज मोठ्या आनंदात साजरी केली जाते. भाऊबीजेच्या या पर्वावर जाणून घेऊ यात बॉलिवूडमधील लोकप्रीय बहिण-भावाबद्दल...सोनम कपूर - हर्षवर्धन कपूरबॉलिवूडमधील लोकप्रीय भाऊ-बहिणींबद्दल बोलायचे तर सोनम कपूर आणि तिचा लाडका भाऊ हर्षवर्धन कपूर यांच्याबद्दल बोललेच पाहिजे.  हे दोघेही परस्परांवर जितके जीवापाड प्रेम करतात. तितकेच एकमेकांचे उणीदुखी काढायलाही मागेपुढे पाहत नाही. अलीकडे सोनम हर्षला प्रेमाने डिवचताना दिसली होती. हर्षची मुलींबद्दलची चॉईस फार वाईट असल्याचे ती म्हणाली होती.  सोनमने बॉलिवूडमध्ये कधीचेच स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  आता तिचा भाऊ हर्षवर्धन याने सुद्धा सोनमच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलीय. ‘मिर्झिया’ या चिटपटाद्वारे हर्षने बॉलिवूड डेब्यू केले.  साजिद खान -फराह खान साजिद खान आणि फराह खान म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रीय बहिण-भावाची जोडी. बॉलिवूडमध्ये दोघांचेही मोठे नाव आहे. दोघांचेही असंख्य चाहते आहेत. फराह साजिदची मोठी बहीण आहे. या ‘आॅल टाईम फेवरेट’ भाऊ-बहिणीत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सैफ अली खान-सोहा अली खानसैफ  आणि सोहा या भावा-बहिणीचे प्रेम आपण अनेकदा पाहिले. अनेकप्रसंगी या दोघांना परस्परांबद्दल बोलतानाआपण पाहिलेत.  सैफ हा सोहाचा मोठा भाऊ आहे. सोहावर त्याचे जीवापाड प्रेम आहे. काही कमर्शिअल जाहिरातीतही भाऊ-बहिणीची ही जोडी दिसली. फरहान अख्तर- जोया अख्तरफरहान व जोया ही बॉलिवूडमधील चर्चित भाऊ-बहिणीची जोडी. जोयाने एक यशस्वी दिग्दर्शिका अशी ओळख निर्माण केली आहे. जोयाच्या ‘दिल धडकने दो’ आणि ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या दोन चित्रपटांमध्ये फरहान काम करून चुकला आहे. तुषार कपूर-एकता कपूरबॉलिवूडच्या लोकप्रीय भाऊ-बहिणींची चर्चा सुुरू असेल आणि तुषार -एकता त्यात नसतील, असे शक्यच नाही. एकता ही तुषारची मोठी बहिण. हे दोघेही भाऊ-बहिण कमी आणि एकमेकांचे मित्र-मैत्रिण जास्त असेच यांचे नाते आहे. तुषारच्या करिअरला एकताने नेहमीच सारवरण्याचा प्रयत्न केलायं. हुमा कुरेशी-साकिब सलीमहुमा कुरेशी आज बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री आहे. तर तिचा भाऊ साकिब बॉलिवूडमधील नवे नाव. ‘गँग आॅफ वासेपूर’सारख्या चित्रपटांतून हुमाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर साकिबला आपण ‘बॉम्बे टॉकिज’ व ‘हवा हवाई’ सारख्या चित्रपटांमधून पाहिले आहे.  रणबीर कपूर- करिना कपूरकपूर घराण्याची मुलगी करिना आणि मुलगा रणबीर कपूर दोघेही चुलत बहिण-भाऊ. दोघांचेही बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र जागा आहे. अनेकदा एकमेकांची टिंगळ-टवाळकी करताना यांना आपण पाहिले आहे. दोघेही एकत्र वाढल्याने त्यांच्यात कमालीचे सामंजस्य आहे.