Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलाच पुरूषांसाठी प्रेरणास्थान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:51 IST

अर्जुन कपूर आर. बल्की यांचा आगामी चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटात करिना कपूर खानसोबत दिसणार आहे. सर्वत्र चित्रपटाविषयी चर्चा ...

अर्जुन कपूर आर. बल्की यांचा आगामी चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटात करिना कपूर खानसोबत दिसणार आहे. सर्वत्र चित्रपटाविषयी चर्चा आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेली महिला-पुरूष समानता हा चर्चेचा विषय बनला आहे.अर्जुनने जागतिक महिला दिनानिमित्त एक अत्यंत सुंदर संदेश देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओत म्हटले आहे की,‘ मी माझी आई आणि माझी बहीण यांच्याभोवतीच लहानाचा मोठा झालो. हा दिवस महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महिला स्वत:ची काळजी न करता घरातील पुरूषवर्गाचीच जास्त काळजी करत बसतात.तुम्ही जर चांगले व्यक्ती असाल तर हा दिवस योग्यप्रकारे साजरा कराल. ’ या व्हिडीओत अर्जुन महिला पुरूषांपेक्षा किती सरस आहेत हे दाखवण्यासाठी अनेक उदाहरणे देतो. केवळ एक दिवसच महिला दिन म्हणून साजरा करणे पुरेसे नाही. तर खुप प्रेम आणि आदर त्यांना मिळायला हवा.https://www.facebook.com/ArjunKapoorOfficial/videos/vb.442125805887831/737753616325047/?type=2&theater