Join us

"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:06 IST

Sonakshi Sinha on Hera Pheri 3 Movie : बॉलिवूडची खाँमोश गर्ल सोनाक्षी सिन्हाने 'हेरा फेरी ३' या बहुप्रतीक्षित चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

बॉलिवूडची खाँमोश गर्ल सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) या बहुप्रतीक्षित चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांच्याशिवाय आगामी चित्रपट 'हेरा फेरी ३' मजेशीर नाही असे सोनाक्षीचे मत आहे. ती 'बाबुराव गणपतराव आपटे'शिवाय चित्रपटाची कल्पनाही करू शकत नाही.

सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच 'हेरा फेरी ३' बद्दल आपले मत मोकळेपणे व्यक्त केले. जर बाबुराव म्हणजेच परेश रावल या चित्रपटात नसतील तर ते मजेशीर होणार नाही असे तिला वाटते. सोनाक्षी म्हणाली की, ''ती परेश रावल यांच्याशिवाय 'हेरा फेरी ३'ची कल्पनाही करू शकत नाही. तिने सांगितले की एक प्रेक्षक म्हणून, बाबूरावचे पात्र तिच्यासाठी चित्रपटाचा प्राण आहे.''

परेश रावल यांच्या निर्णयामुळे चाहत्यांना बसला धक्कापरेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, ते 'हेरा फेरी ३'चा भाग नाहीत. त्यांनी असेही म्हटले होते की चित्रपट सोडण्याचे कारण कोणतेही भांडण किंवा क्रिएटिव्ह मतभेद नाहीत आणि त्यांचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी कोणतेही वाद नाहीत. परेश रावल यांच्या या वृत्तानंतर चाहते खूप दुःखी झाले आहेत कारण बाबुरावची व्यक्तिरेखा या फ्रँचायझीची ओळख बनली आहे.

सोनाक्षी झळकणार परेश रावल यांच्यासोबतसोनाक्षीने परेश रावल यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे. दोघांनीही अलिकडेच 'निकिता रॉय' चित्रपटात एकत्र काम केले आहे. सोनाक्षी म्हणाली की, ''परेश रावल यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्याच्या अभिनयाने खूप प्रभावित आहे. जेव्हा सोनाक्षीला विचारले गेले की तिला परेश रावल कॉमेडीमध्ये जास्त आवडतात की गंभीर भूमिकांमध्ये, तेव्हा ती म्हणाली, 'ते दोन्ही भूमिकांमध्ये चमत्कार करतात. त्यांना कोणत्याही एका श्रेणीत बांधता येत नाही.''  

'निकिता रॉय' सिनेमाबद्दल

सोनाक्षीचा 'निकिता रॉय' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. तिचा भाऊ कुश सिन्हा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुहेल नायर हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :परेश रावलसोनाक्षी सिन्हा