Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘सरकार ३’मध्ये अभिषेक दिसणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 16:12 IST

राम गोपाल वर्माने काही दिवसांपूर्वी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सरकार ३’ सिनेमा काढण्याची घोषणा केली होती. नंतर बिग बींनीदेखील ...

राम गोपाल वर्माने काही दिवसांपूर्वी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सरकार ३’ सिनेमा काढण्याची घोषणा केली होती. नंतर बिग बींनीदेखील याला दुजोरा दिला होता.आता ‘सरकार’ सिरीजमधील तिसरा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मग या सिनेमात अभिषेक बच्चनही दिसणार का याची चर्चा सुरू झाली.खुद्द अभिषेक याविषयी सांगतो की, ‘सरकार’ मधील भूमिका माझी वैयक्तिक फेव्हरेट आहे. त्यामुळे तिसºया चित्रपटातही मला काम करायला आवडेल. परंतु ‘सरकार २’मध्ये माझे पात्र मारले गेल्यामुळे ते शक्य होईल का हा प्रश्न आहे.निर्माते आणि रामूलासुद्धा ज्युनियर बच्चन चित्रपटात असावा असे वाटते. लेखकांना यासंदर्भात काही तरी पर्याय शोधून काढण्यास त्याने सुचना केल्या आहेत.बिग बी सोबत स्क्रीन शेअर करण्याबद्दल अभिषेक म्हणतो, त्यांच्यासोबत काम करताना माझा दर्जा वाढतो. ‘टीन’मधील त्यांचा अभिनय तर ‘अभिनय म्हणजे काय’ याचा वस्तूपाठच आहे.