Join us
Daily Top 2Weekly Top 5

​का ठेवले गेलेय करिनाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 16:30 IST

करिना कपूर लवकरच बाळाला जन्म देणार आहे. करिनाला मुलगा होणार की मुलगी, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच करिनाची प्रकृती ...

करिना कपूर लवकरच बाळाला जन्म देणार आहे. करिनाला मुलगा होणार की मुलगी, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच करिनाची प्रकृती बिघडल्याची बातमी आहे. प्रसूतीची तारीख जवळ आली असतानाच करिनाला रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. सध्या करिनावर घरीच उपचार सुरु आहे. प्रेग्नंसीदरम्यानही करिना अनेक इव्हेंटमध्ये दिसली. इतकेच नाही तर कमर्शिअल शूटही तिने केले.अलीकडे करिना फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या पार्टीत दिसली होती.या पार्टीत  अमृता अरोरा, मलायका आणि करिश्मा कपूर या सगळया जणींसोबत करिनाने धमाल मस्ती कली होती. यानंतर करिनाला  अचानक रक्तदाबाचा त्रास सुरु झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेग्नंसीच्या काळात रक्तदाबाचा त्रास होणे तशी सामान्य बाब आहे. पण करिनाला त्रास होत आहे म्हटल्यावर सैफ अली खान प्रचंड घाबरला. यानंतर लगेच त्याने डॉक्टरांना बोलवले. करिना सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  कपूर कुटूंबियांसह करिनाच्या चाहत्यांना नव्या पाहुण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसापूर्वीच्या तपासणीत करिनाच्या पोटातील अर्भक तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले होते.   डॉक्टरांनी करिनाला प्रसूतीसाठी २० डिसेंबर ही तारीख दिली आहे. मात्र, तिची प्रसूती नैसर्गिकरित्या होणार की नाही हे अद्याप सांगता येण्यासारखे नाही. करिनाचे स्वास्थ्य आणि बाळाची स्थिती पाहूनच तारीख जवळ येताच डॉक्टर याबाबत निर्णय घेतील. सध्या, आम्ही फक्त आमच्या नातवंडाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत, अशी माहिती अलीकडे करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी दिली होती.