Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानचे बायोपिक कधीच होणे नाही! हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:02 IST

अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. बायोपिकच्या याच रांगेत आता सलमान खानच्या बायोपिकचीही चर्चा रंगू लागली आहे. 

अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. होय, हा चित्रपट म्हणजे, एका गुन्हेगाराचे उदात्तीकरण आहे, असा आरोप होत आहे. बायोपिकच्या याच रांगेत आता सलमान खानच्या बायोपिकचीही चर्चा रंगू लागली आहे. संजय इतकेच सलमानचे आयुष्यही वादग्रस्त राहिले आहे. बायोपिकसाठी हा इतका मसाला पुरे आहे. त्यामुळे सलमानच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यास अनेक बडे निर्माते-दिग्दर्शक टपलेले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बड्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी यासाठी सलमानच्या कुटुंबाशी संपर्क साधला. सलमानच्या बायोपिकसाठी परवानगी मिळावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. पण नाही, सलमानचे कुटुुंब बधले नाही. किंबहुना सलमानही मानला नाही. सलमानच्या आयुष्याची आधीच बरीच चर्चा झाली आहे. त्याच्याबद्दल नाही नाही त्या स्टोरी बनवल्या गेल्या आहेत. आता आम्हाला सलमानचे आयुष्य आणखी चव्हाट्यावर आणायचे नाही. तो ‘पब्लिक फिगर’ आहे. पण त्याच्यावर बायोपिक यावी, अशी आमची मुळीच इच्छा नाही. ते कधीही होणे नाही, असे सलमानच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे. केवळ सलमानच्या कुटुुंबाचेच नाही तर सलमानचेही हेच मत आहे. त्याचीही बायोपिकला ‘ना’ आहे, असे कळतेय. त्यामुळे आत्ता काय तर येणाऱ्या काळातही सलमानचे बायोपिक होणे नाही. या बातमीने सलमानच्या चाहत्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. पण शेवटी भाईजानने ‘ना कर दी तो कर दी...’ 

 

टॅग्स :सलमान खान