KGF सिनेमाच्या माध्यमातून सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणजे यश. (yash) अभिनेता यशची सध्या खूप चर्चा आहे. यामागील कारण म्हणजे यश सध्या 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'रामायण' (ramayan) सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात रणबीर कपूर (ranbir kapoor) प्रभू श्रीरामांची भूमिका साकारतोय तर अभिनेत्री साई पल्लवी (sai pallavi) सिनेमात सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. सुपरस्टर यशने 'रामायण' सिनेमा का स्वीकारला, याचं खास कारण त्याने सर्वांना सांगितलंय. 'रामायण' सिनेमाची ऑफर का स्वीकारली?
यश 'रामायण' सिनेमात रावणाची भूमिका साकारतोय यावर काहीच महिन्यापूर्वी शिक्कामोर्तब झालं. नुकतंच नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रावणाची भूमिका का स्वीकारली यावर यशने खुलासा केलाय. यश म्हणाला की, "रामायण सिनेमात इतर भूमिका करण्यामध्ये मला काही रस नव्हता. रावणाची व्यक्तिरेखा खूप आकर्षक आहे. यामागे अन्य कोणतेही कारण नाही. रावणाच्या व्यक्तिरेखेच्या छटा आणि व्यक्तिमत्वाचा सखोलपणा मला आवडतो. त्यामुळे रावणाच्या भूमिकेला वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणण्यास मी उत्सुक आहे."
कधी रिलीज होणार 'रामायण'?
सध्या 'रामायण' सिनेमाचं शूटिंग मुंबईत सुरु आहे. यश शूटिंगसाठी मुंबईत आलाय. या सिनेमाबद्दल सांगायचं तर, 'रामायण' हे महाकाव्य नितेश तिवारी दोन भागांमध्ये आपल्यासमोर आणणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. नमित मल्होत्रा यांनी या बिग बजेट सिनेमाची निर्मिती केलीय. सिनेमातील प्रमुख स्टारकास्टसोबत लारा दत्ता, सनी देओल, रवी दुबे हे कलाकार पौराणिक भूमिकांमध्ये दिसणार आहेत.