Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कंगणा राणौतला का आठवण आली त्या दिवसाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 12:32 IST

कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. पण तरीही कंगनाने नुकतीच ‘स्टार प्लस’वरील ...

कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. पण तरीही कंगनाने नुकतीच ‘स्टार प्लस’वरील ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करण परीक्षकाची भूमिका बजावतो. करणनेच कंगनाला अतिथी परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. कंगनानेही त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि ती या कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी कंगना आणि करण दोघेही एकमेकांशी हसून खेळून बोलत होते आणि त्यांच्यात हास्यविनोदही सुरू होते. त्यामुळे आता करण आणि कंगना यांच्यातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला असल्याची चर्चा रंगली आहे.बॉलीवूडमध्ये कोणीही नातेवाईक किंवा मित्र नसताना या क्षेत्रात सुपरस्टार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य घरातील होतकरू तरुण-तरुणींना सुपरस्टारपदाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात करण जोहरसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमात दहा अभिनेता-अभिनेत्रींच्या जोड्या आहेत आणि ते दर शनिवार-रविवारी परीक्षकांपुढे आपला अभिनय सादर करतात.हिंदी चित्रपटांमध्ये नायक-नायिका बनण्यासाठी आलेल्या या होतकरू कलाकारांच्या संघर्षाकडे बघताना अतिथी परीक्षक म्हणून आलेल्या कंगनाने त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना आपल्या पहिल्या ऑडिशनच्या वेळचा प्रसंग सांगितला. तिने सांगितले, “मी माझे पहिले ऑडिशन कसे दिले, ते माझ्या चांगलंच लक्षात आहे. त्यावेळी ऑडिशनला आलेल्या सगळ्या मुली उंच टाचांचे बूट घालून आणि मेक-अप करून आल्या होत्या. त्यांचे लक्ष केवळ त्यांच्या दिसण्याकडे होते. पण माझे लक्ष माझ्या मेकअपवर नव्हे तर केवळ अभिनयावर होते. मी थेट अनुरागसरांकडे (अनुराग बासू) गेले आणि मला कोणती भूमिका साकारावयाची आहे, असे त्यांना विचारले. तेव्हा गँगस्टर चित्रपटात मद्याच्या नशेत असलेल्या एका मुलीची भूमिका रंगवायची आहे, असे मला सांगण्यात आले. तेव्हा मी त्यानुसार मला तयार केले आणि ऑडिशन दिले. कोणाला काय वाटेल, म्हणून तुम्ही स्वत:ला बदलू नका. तुमची स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करा असे मी सगळ्यांना सांगेन.”Also Read : पहिल्यांदा बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचली कंगना राणौत! तुम्हीही जाणून घ्या कारण!!