Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफर्स पाहताच रितेश देशमुखची मुलं का करतात नमस्कार, खुद्द त्यानेच केला खुलासा

By तेजल गावडे | Updated: March 10, 2020 18:04 IST

रितेश देशमुख व जेनेलिया डिसुझा देशमुखेचे रिहान आणि राहील हे दोन्ही मुलंदेखील चर्चेत येत असतात.

बॉलिवूडचे स्टारकिड्सदेखील त्यांच्या पालकांप्रमाणे चर्चेत येत असतात. हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे स्टार कीड सध्या जोरदार चर्चेत आहेत. यासोबतच करिना कपूरचा तैमूर आणि रितेश देशमुख व जेनेलिया डिसुझा देशमुखेचे रिहान आणि राहील हे दोन्ही मुलंदेखील चर्चेत येत असतात.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा देशमुख यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांचे फोटो ते अनेकवेळा त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. पण त्या दोघांनाही खूपच कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.  मीडियाचे कॅमेरे पाहताच रिहान व राहिल हात जोडत सगळ्यांना नमस्कार करत असतात. त्यांचा हा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो.

याबाबत रितेशला विचारलं असता तो म्हणाला की, मुलांना सगळ्यांपासून दूर ठेवू शकत नाही.  घरातून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर लपून तर जाऊ शकत नाही. मीडिया तर सगळीकडे असणार आहे. त्यामुळे घरी जे संस्कार दिले आहेत. मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे. तेवढे ते करतात. फोटोग्राफर दोन फोटो काढून निघून जातात.

रितेश पुढे म्हणाला की,  बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तिथे मीडिया नसते. पण जिथे मीडिया असते  तिथे आदरपूर्वक त्यांना त्यांचे काम करू देतो. तेही आम्हाला आदराने वागणूक देतात.

वाह! रितेश आणि जेनेलियाचं मुलांना दिलेल्या संस्कारासाठी कौतूक करावं तेवढं कमीच आहे.

 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा