Join us

'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाली- "ऑफर आलेली, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:11 IST

पहिला भाग गाजवूनही रेड २ मध्ये का दिसली नाही इलियाना? अभिनेत्रीने खरं कारण सांगून सर्व चर्चांवर पडदा पाडलाय

 

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'रेड २' सिनेमा चांगलाच गाजला. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता रितेश देशमुख या दोघांची अभिनय जुगलबंदी बघण्यास सर्वांना मजा आली. 'रेड'च्या पहिल्या भागात अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झळकली होती. पण  'रेड'च्या दुसऱ्या भागात इलियानाच्या जागी वाणी कपूरची वर्णी लागली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. 'रेड'चा पहिला भाग गाजवणारी इलियाना  'रेड २'मध्ये का दिसली नाही, यामागचं खरं कारण तिने उघड केलंय.

'रेड २'मध्ये का दिसली नाही इलियाना?

इलियानाला याविषयी एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याला उत्तर देताना इलियाना म्हणाली, "मला रेड २ मध्ये काम करायचं होतं. रेड हा माझ्यासाठी एक खास सिनेमा होता. मालिनीची भूमिका करणं, याशिवाय दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि अजय देवगणसोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. रेड २ च्या मेकर्सने मला दुसऱ्या भागासाठीही विचारलं होतं. परंतु दुर्दैवाने आम्ही शूटिंगच्या वेळा निश्चित करु शकलो नाही. कारण त्यावेळी मला बाळ झालं होतं आणि त्याची जबाबदारी घेणं मला भाग होतं." 

'रेड २'मध्ये इलियानाच्या जागी वाणी कपूर दिसली. वाणी आणि इलियानामध्ये यामुळे मतभेद झाले अशीही चर्चा होती. त्याविषयी इलियाना म्हणाली, "मी रेड २ सिनेमाचे जे प्रोमो पाहिले त्या प्रत्येक प्रोमोमध्ये वाणी खूप सुंदर दिसतेय. मला पूर्ण विश्वास आहे की, वाणीने सिनेमात तिची वेगळी छाप सोडली असेल. त्यामुळे आता कोणाच्या मनात कसलाही गैरसमज नसेल, अशी मला आशा आहे."

टॅग्स :इलियाना डीक्रूजअजय देवगणवाणी कपूरबॉलिवूडधाड