‘अरे ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा...’ हे शम्मी कपूरवर चित्रीत करण्यात आलेले गाणे आठवतेय का? हे गाणे कानी पडले की, नकळत कोणीही त्यावर डान्स करू लागते. आता हेच गाणे ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये शम्मी कपूरचे नातू रणबीर कपूर आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. अतिशय फनी स्टाईलने हे गाणे शूट करण्यात आले असून कोणीही ते एन्जॉय करेल असे ते गाणे होते. मात्र, दिग्दर्शक करण जोहरने हे गाणे चित्रपटातून वगळले असल्याचे कळतेय. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेलाच आहे. कधी सीन्स सेन्सॉरच्या कात्रीतून तर कधी गाणे चित्रपटातून वगळण्यात येत आहेत. दिग्दर्शक करण जोहरने चित्रपटातून एक गाणे नुकतेच वगळलेय. ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ हे ते गाणे असून सोशल मीडियावर मात्र हे डिलीटेड साँग हिट झाले आहे. करण जोहरने टिवटरवर ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या लिंकखाली डिलिटेड साँगची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे,‘ एडीएचएम! थँक यू फॉर द लव्ह, लेट्स कीप सेलिब्रिटींग! विथ लव्ह फ्रॉम एडीएचएम.’ गाण्यात शूट करण्यात आलेले पॅरिस पाहून प्रत्येकजण नॉस्टॅल्जिक होणारच. रणबीर आणि अनुष्का यांनी शम्मी कपूर यांच्यासाठी हे गाणे श्रद्धांजली म्हणून जाहीर केले आहे.
">http:// {{{{twitter_post_id####{{{{twitter_post_id####}}}}}}}}