आलिया आणि वरुण एकमेकांना फूले फेकून का मारत आहेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 10:48 IST
आता आलिया व वरूण या दोघांचा एक सुपर एक्साईटींग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने आपल्या आॅफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आलिया आणि वरुण एकमेकांना फूले फेकून का मारत आहेत...
आलिया भट्ट आणि वरूण धवन गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये धम्माल मस्ती करीत होते. अर्थात मस्ती म्हणजे शूटींग. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या शूटींगधमध्ये आलिया व वरूण सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरु होते. यादरम्यान सेटवरचे दोघांच्या धम्माल-मस्तीचे अनेक फोटो आपण पाहिलेत, त्यांच्याबद्दलचे अनेक किस्सेही आपण वाचलेत. आता आलिया व वरूण या दोघांचा एक सुपर एक्साईटींग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने आपल्या आॅफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.Badri & Dulhania, sharing your endless before they back home. It's a wrap for #BadrinathkiDulhania at #Singapore!,असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. यात आलिया व वरूण एकमेकांकडे एक पुष्पगुच्छ फेकताना दिसत आहे. म्हणजेच काय तर दोघेही मस्ती मूडमध्ये फुल्ल टू एन्जॉय करताना दिसत आहे. हा आनंद कसला? तर ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’चे सिंगापूरमधील शूटींग शेड्यूल संपल्याचा. होय, चित्रपटाचे सिंगापूरमधील शूटींग संपल्यामुळे ‘टीम बद्रिनाथ’ने आवराआवर चालवलीय. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’चा सीक्वल आहे. 2014 मध्ये आलेला शशांक खैतान दिग्दर्शित ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. तरूणाईने हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. आता ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ ला तरूणाई किती भरभरून प्रतिसाद देतेयं, ते बघूयात!!