फोटोमध्ये अनुष्का स्माइल देताना दिसत असून, तो चिमुकला तिच्या कडेवर झोपलेला असल्याचे दिसत आहे. हा चिमुकला शिखर धवनचा मुलगा जोरावर असून, त्याला अनुष्काची कंपनी चांगलीच आवडल्याचे दिसून येत आहे. दोघांचा हा फोटो खूपच गोंडस असून, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, तर दुसºया एका व्हिडीओमध्ये विराट जोरावर कडेवर घेऊन भांगडा करताना दिसत आहे. ११ डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याने दिल्ली येथे शाही रिसेप्शन दिले. त्याचबरोबर येत्या २६ डिसेंबरला मुंबई येथेही रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रिसेप्शन सोहळा संपल्यानंतर विरुष्काने हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले. सध्या हे दाम्पत्य मुंबई येथे पोहोचले असून, तेथील रिसेप्शनच्या तयारीला लागले आहेत. २६ डिसेंबर रोजी मुंबई येथे या दाम्पत्याच्या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.