रणवीरसोबत ‘ती’ मुलगी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 12:57 IST
बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर-दीपिका आता वेगळ्या होण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू असताना रणवीर सिंगच्या बाबतीत एक शॉकिंग ...
रणवीरसोबत ‘ती’ मुलगी कोण?
बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर-दीपिका आता वेगळ्या होण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू असताना रणवीर सिंगच्या बाबतीत एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. मुंबईतील बँड्रा परिसरात तो एका ‘मुलीसोबत’ संपूर्ण दिवस होता.ती मुलगी कोण होती जिच्यासाठी रणवीर व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून तिच्यासोबत सकाळी ४.३० वाजेपर्यंत होता? हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. ते ज्या ठिकाणी होते तेथे जेव्हा मीडिया पोहचला तेव्हा ही बातमी सगळीकडे वाºयासारखी पसरली. मीडियापासून ‘त्या’ मुलीची ओळख लपविण्यासाठी रणवीर शर्थीचे प्रयत्न करताना दिसला.सुत्रांनुसार, संजय लीला भंसाळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटाची तयारी सुरू झाली असून सर्व कालाकारांनी आपापल्या भूमिकेची रंगीत तालीम करण्यास प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रणवीर त्याच्या या खास ‘मैत्रिणी’सोबत आपल्या ‘अल्लाउद्दीन खिलजी’च्या रोलची रिहर्सल करीत होता.मीडियाला जेव्हा या गोष्टीची भनक लागली तेव्हा अनेक छायाचित्रकार तेथे जमा झाले. हे पाहून रणवीर चांगलाच संतापला. मीडियाला टाळण्यासाठी त्याने ड्रायव्हरला गाडी घेऊन बाहेर जाण्यास सांगितले. पण त्याची ही चलाखी काही कामी आली नाही. छायाचित्रकार तेथेच ठाण मांडून बसलेले होते. कोण होती ती? : असे तर दीपिका रणवीरला विचारत नसेल ना!‘त्या’ मुलीची ओळख बाहेर न येऊ देण्यासाठी रणवीरला पहाटे ४.३० वाजेपर्यंत बसावे लागले. आता एवढी गुप्तता बाळगण्याचे काय कारण असू शकते? ती मुलगी कोण? आणि चित्रपटात दीपिका असताना रणवीर दुसऱ्या मुलीसोबत का रिहर्सल करतोय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळणे बाकी आहे.पुढील वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणाऱ्या ‘पद्मावती’मध्ये दीपिका टायटर रोल करीत असून शाहिद कपूर राणा रावल सिंगच्या भूमिकेत आहे. दीपिकाची शाहिदसोबत वाढणारी सलगी रणवीर सहन होत नसल्यामुळे दोघांच्या नात्यात दूरावा आल्याचे सांगितले जातेय.