कोण आहे फ्रेडी दारूवालाचे प्रेरणास्थान ?कोणत्या भूमिकेसाठी फ्रेडी घेतोय मेहनत ? जाणून घ्या फ्रेडीचे हे खास रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 11:44 IST
आपल्या पहिल्याच सिनेमातून खिलाडी अक्षय कुमारसह स्क्रीन शेअर करत त्यानं रसिकांची मने जिंकली. हॉलीडे या पहिल्याच सिनेमात खलनायकाची भूमिका ...
कोण आहे फ्रेडी दारूवालाचे प्रेरणास्थान ?कोणत्या भूमिकेसाठी फ्रेडी घेतोय मेहनत ? जाणून घ्या फ्रेडीचे हे खास रहस्य?
आपल्या पहिल्याच सिनेमातून खिलाडी अक्षय कुमारसह स्क्रीन शेअर करत त्यानं रसिकांची मने जिंकली. हॉलीडे या पहिल्याच सिनेमात खलनायकाची भूमिका साकारत रसिकांवर जादू करणारा हा कलाकार म्हणजे मॉडेल आणि अभिनेता फ्रेडी दारुवाला. यानंतर फ्रेडीने मागे वळून पाहिलंच नाही. नुकतंच त्याची छोटीशी मात्र तितकीच महत्त्वाची भूमिका असलेला फोर्स-टू हा सिनेमाही रुपेरी पडद्यावर झळकला. यातील भूमिकाही रसिकांना भावतेय. याच निमित्ताने फ्रेडी दारुवाला याच्याशी साधलेला हा संवादमनीष मल्होत्राचे तुझ्या जीवनातील स्थान काय ?माझ्या जीवनात मनीष मल्होत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनीष माझा मार्गदर्शक आहे. माझ्या पडत्या काळात मनीषने खूप मदत केली. त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त फॅशन शो मी केलेत. त्यामुळे अनेकजण मल विचारतात की तू मनीषचे फॅशन शो जास्त का करतो ? फॅशन जगतातलं मनीष हे सगळ्यात मोठं नाव आहे. त्याचे शो केले तर कुठे बिघडले असं मला वाटते. फॅशनसोबतच सिनेमाबाबतही मनीषला बरीच माहिती आहे. त्यानेच मला मॉडेलिंग सोडून अभिनय करण्याचा सल्ला दिला. मॉडेलिंग करता करता सिनेमात कशी एंट्री झाली ? हॉलिडे सिनेमाची ऑफर कशी मिळाली ?अभिनय पूर्णपणे नवा प्रांत असल्याने अभिनय आणि एक्शनचे क्लासेस लावले. शून्यापासून सुरुवात करायची असल्याने माझ्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या होत्या.. सुरुवातील संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय यांच्यासह शेर नावाचा सिनेमा केला. 80 टक्के सिनेमाचं शुटिंगही पूर्ण झाले. मात्र दुर्दैवाने हा सिनेमा रिलीज काही झाला नाही. त्यानंतर विपुल शाह यांच्या कमांडो सिनेमासाठी मला ऑडिशनला बोलावण्यात आले. माझ्या ऑडिशनचे कौतुकही झाले मात्र काही कारणामुळे जी संधी हवी होती ती मिळाली नाही. विपुल शाह यांनी मग माझे ऑडिशन दिग्दर्शक ए.आर.मुरगोदॉस यांना दाखवले. हे ऑडिशन पाहून त्यांनी मला हॉलिडे सिनेमातील भूमिका ऑफर केली. यातील भूमिका खलनायकी स्वरुपाची असल्याने द्विधा मनस्थितीत होतो. मात्र ही संधी सोडायची नव्हती. तसंच खिलाडी अक्षय कुमारसोबत पहिल्याच सिनेमात काम करण्याची संधी फार कमी जणांना मिळते. ती मला मिळालेली सुवर्णसंधी मला सोडायची नव्हती. सिनेमाच्या शुटिंगवेळी अक्षयने मला स्टंट आणि एक्शन करण्याच्या टीप्स दिल्या. त्यामुळे माझा नर्व्हसनेस निघून गेला. यानंतर अक्षयलाही मी काही फाईट मारल्या. त्यावेळी मलाच ओशाळल्यासारखे झाले. तुझ्यासाठी सिनेमातील एंट्री फारशी सोपी नव्हती. स्टार किड्सना बॉलीवुड एंट्री आणि यश सहजासहजी मिळते असे वाटते का ?मला असे वाटत नाही. स्टार पुत्र किंवा मुलगी असल्याचा थोडा फार फायदा होत असेल. बॉलीवुडमधील अनेक जण ओळखत असतील. मात्र बॉलीवुडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी आणि इथे टिकून राहण्यासाठी तुमच्यात ते अभिनयाचे गुण असले पाहिजेत. तुमच्यात अभिनय कौशल्य आणि भूमिका साकारण्यासाठी लागणारे इतर गुण नसतीलच तर स्टार पुत्र किंवा स्टार मुलगी असलात तरी काही फरक पडत नाही असे मला वाटते. हा एक मात्र आहे की स्टार किड्सना सामान्यांच्या तुलनेत थोडे लवकर एंट्री मिळत असेल. मात्र एंट्री मिळाली तरी इथे मेहनत आणि स्ट्रगल करणाराच टिकाव धरु शकतो. हॉलिडे सिनेमानंतर फोर्समध्ये एकदम वेगळी भूमिका साकारली. रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हे पाहून कसे वाटते ? हॉलिडे सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र फोर्स टूमध्ये छोटीशीच मात्र तितकीच महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रसिकांना ही भूमिका आवडली याचा मला खूप आनंद आहे. पॉझिटिव्ह भूमिकेच्या माध्यमातून माझी ही बॉलीवुडमध्ये ख-या अर्थाने एंट्री झालीय असे मला वाटते. आगामी काळात कोणत्या भूमिका करायला आवडतील आणि तुझ्या आगामी सिनेमांविषयी काय सांगशील?येत्या काळात मला रोमँटिक भूमिका साकारण्याची इच्छा आहे. ही भूमिका साकारताना काही तरी वेगळे करायला मिळेल असे मला वाटते. रोमँटिक भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो असा मला विश्वास आहे. आगामी काळात मी 'कमांडो टू' या सिनेमात काम करतो आहे. यांत माझा डान्स रसिकांना पाहायला मिळेल. याशिवाय उम्मीद या सिनेमात काम करतो आहे. या सिनेमात मी प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव असेल. आगामी सिनेमात माझा शंभर टक्के परफॉर्मन्स द्यायचे हे मी ठरवले आहे. मागे वळून पाहताना काय वाटते आणि भविष्यात येत्या काही वर्षात स्वतःला कुठे बघतोस ?मॉडेल म्हणून माझ्यापुढे एक मोठं आव्हान होते. मॉडेल म्हणून असलेली ओळख, लूक्स मागे सोडून स्वतःला एक कलाकार आणि अभिनेता म्हणून पुढे आणणे सर्वात कठीण होते असे मला वाटते. मात्र ते मी करु शकलो याचा मला आनंद आहे. आता विमानतळ, मॉल्स, घराजवळ, परदेशात सगळेच लोक मला ओळखतात. अभिनेता आणि बॉलीवुड कलाकार म्हणून रसिकांना ओळख झाली याचा खूप खूप आनंद आहे. यानंतरही मला चांगल्या चांगल्या भूमिका करायच्या आहेत. कोणतेही टार्गेट असे मी सेट केलेले नाही. फक्त वाट्याला येतील त्या भूमिका आणि मिळेल ते काम पूर्ण निष्ठेने करायचे असे ठरवले आहे. सध्या छोट्या छोट्या भूमिका करत असलो तरी आगामी काळात सिनेमातील प्रमुख भूमिकाही साकारेन असा मला विश्वास आहे. सिनेमाच्या ऑफर्स आल्यानंतर कुणाचा सल्ला घेतो ?सिनेमाच्या ऑफर्स आल्या की विपुल शाह यांना जाऊन भेटतो. त्यांचा सल्ला घेतो. सिनेमा करावी की स्वीकारु नये याबाबत त्यांचे मत जाणून घेतो. ते जो सल्ला देतात त्यानुसारच मी माझा निर्णय घेतो. मात्र एक कलाकाराला जे काम मिळेल ते त्याने काम करावे. आपल्या क्रिएटिव्हिटीमधून कदाचित काहीतरी वेगळे समोर येईल. विविध प्रकारच्या भूमिका, विविध सिनेमांत काम करण्याची माझी इच्छा आहे.