कोण आहे अक्षय कुमारचा फेव्हरेट व्यक्ती? जाणून घेण्यासाठी वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 18:03 IST
कोण असेल बरे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फेव्हरेट व्यक्ती? कुठे भेटला त्याला तो? त्याचे काही फोटो आपल्याला पाहता येतील ...
कोण आहे अक्षय कुमारचा फेव्हरेट व्यक्ती? जाणून घेण्यासाठी वाचा...
कोण असेल बरे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा फेव्हरेट व्यक्ती? कुठे भेटला त्याला तो? त्याचे काही फोटो आपल्याला पाहता येतील का? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण, जरा थांबा..कारण अक्षयला हा त्याचा फेव्हरेट व्यक्ती केपटाऊनला भेटलाय म्हणे. नुकतेच अक्षय कुमार नववर्ष आणि टिवंकल खन्नाच्या वाढदिवसासाठी केपटाऊनला गेला होता. तिथे त्याला एक मुलगा भेटला. ज्याचे नाव ‘व्हॅलेंटिनो’. या मुलावर अक्की जाम खुश आहे. केप टाऊनमध्ये पत्नी टिवंकलचा ४२ वा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी अक्षय कुमार फॅमिली, मित्र परिवार यांच्यासह गेला होता. साऊथ आफ्रिकेत तो कुटुंबियांसमवेत न्यू इअरच्या स्वागतासाठी गेला. तिथे तो एका मुलाला भेटला. जो केप टाऊनमधील त्याच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे. अक्कीने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘मुलांनो आणि मुलींनो, व्हॅलेंटिनोला भेटा, केप टाऊनमधील माझ्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीचा हा मुलगा. घरात तो सर्वांचा चाहता आहे. तसाच मलाही तो प्रचंड आवडतो. त्याच्यात असलेला उत्साह हा खरंच कौतुकास्पद आहे.’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. फोटोत अक्षय कुमार त्याला जवळ पकडून उभा आहे. ‘जॉली एलएलबी २’ या त्याच्या आगामी चित्रपटात हुमा कुरेशी, अक्षय कुमार हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १० फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होणार आहे.