Join us  

रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:38 PM

Rajinikanth: आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे रजनीकांत (rajinikanth). थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे रजनीकांत यांची एक झलक पाहता यावी यासाठी अनेक जण कसोशीने प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते कुठेही दिसले तरीदेखील त्यांच्याभोवती चाहत्यांचा घोळका होतो. अभिनयाप्रमाणेच रजनीकांत त्यांच्या लक्झरी लाइफस्टाईलमुळेही चर्चेत येतात. आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती.

खरं तर रजनीकांत सारख्या दिग्गज अभिनेत्याला कोणी भिकारी समजेल ही कल्पनाच करणं अशक्य आहे. परंतु, हो. रजनीकांत यांच्यासोबत हा किस्सा घडला आहे. इतकंच नाही तर या महिलेने भीक म्हणून दिलेल्या १० रुपयांचा त्यांनी स्वीकारही केला होता.

खऱ्या आयुष्यातही Rajinikanth आहेत 'थलायवा'; संपत्तीचा आकडा ऐकून फिरतील डोळे

नेमका काय आहे हा किस्सा?

साधारणपणे १५ वर्षांपूर्वी हा किस्सा रजनीकांत यांच्यासोबत घडला होता. २००७ मध्ये रजनीकांत यांचा 'शिवाजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. केवळ गाजलाच नाही तर त्याने रेकॉर्डही केला होता. त्यामुळे चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून रजनीकांत त्यांच्या काही मित्रांसोबत एका देवळात देवाचं दर्शन करण्यासाठी गेले होते. यावेळी रजनीकांत यांनी त्यांची ओळख पटू नये यासाठी म्हाताऱ्या व्यक्तीचा गेटअप केला होता.

देवळात जाण्यासाठी रजनीकांत पायऱ्या चढत असतांनाच एक महिला त्यांच्यासमोर आली आणि तिने त्यांच्या हातावर १० रुपयांची नोट टेकवली. वयस्क व्यक्ती असल्यामुळे त्यांना कदाचित या पैशांचा काही तरी उपयोग होईल म्हणून तिने ही नोट त्यांना दिली. विशेष म्हणजे थलायवानेही ती नोट स्वीकारली.

दीवार ते नमक हलाल! बिग बींच्या 'या' सिनेमांच्या तमिळ रिमेकमध्ये झळकलेत रजनीकांत; पाहा चित्रपटांची लिस्ट

दरम्यान, देवळात गेल्यानंतर रजनीकांतने त्यांच्या पाकिटात असलेले सगळे पैसे देवाच्या चरणी अर्पण केले. हे सारं ती महिला पाहत होती. यावेळी तिने रजनीकांत यांना निरखून पाहिलं आणि तिला त्यांची ओळख पटली. आपण पैसे दिलेली व्यक्ती रजनीकांत असल्याचं लक्षात येताच तिने रजनीकांत यांची माफी मागितली आणि ते १० रुपये परत देण्याची विनंती केली.  परंतु, ते १० रुपये मी देवाच्या चरणी अर्पण केले. असं म्हणत रजनीकांत यांनी त्या महिलेला केवळ मला तुमचा आशिर्वाद द्या असं सांगितलं. हा किस्सा त्याकाळी तुफान गाजला होता. परंतु, रजनीकांत यांनी जो नम्रपणा दाखवला त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

टॅग्स :रजनीकांतTollywoodसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी