Join us

शाहरुख खानने या कारणामुळे खाल्ली होती जेलची हवा, एक रात्र राहावे लागले होते लॉकअपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:53 IST

तुम्हाला माहीत आहे का, शाहरुखला एकदा जेलची हवा खायला लागली होती. शाहरुखने संपूर्ण एक रात्र जेलमध्ये घालवली होती.

ठळक मुद्देशाहरुखला पोलीस अटक करायला आलेत हे कळल्यावर शाहरुख त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेला होता आणि त्याला एक रात्र लॉकअपमध्ये घालवावी लागली होती. दुसऱ्या दिवशी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान मागील वीस महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता. त्यामुळे शाहरुखचे फॅन्स त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यास आतुर आहेत. शाहरुख खानचे फॅन्स दीर्घकाळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट बघतायेत. शाहरुख खानने नुकतीच त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने सिद्धार्थ आनंद यांचा 'पठाण' सिनेमा काही दिवसांआधी साईन केला आहे. 

शाहरुख खानला आज जगभरात अनेक फॅन आहेत. त्याच्याविषयी जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. तुम्हाला माहीत आहे का, शाहरुखला एकदा जेलची हवा खायला लागली होती. शाहरुखने संपूर्ण एक रात्र जेलमध्ये घालवली होती. १९९३ मध्ये माय मेमसाहब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. शाहरुख खान आणि दीपा साही यांच्यावर बोल्ड दृश्य चित्रीत करण्यात आले होते. 

दीपा ही दिग्दर्शक केतन मेहता यांची पत्नी आहे. या चित्रपटाच्या संबंधीत एक न्यूज त्यावेळी एका मासिकामध्ये आली होती. त्यात लिहिण्यात आले होते की, या चित्रपटातील बोल्ड दृश्य चांगल्याप्रकारे चित्रीत करता यावे यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने शाहरुख आणि दीपाला एक रात्र एकमेकांसोबत घालवायला सांगितली होती. ही न्यूज वाचून शाहरुख प्रचंड भडकला होता आणि थेट मासिकाच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. तसेच ही न्यूज लिहिणाऱ्या पत्रकाराला त्याने मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात मासिकाच्या संपादकाने तक्रार नोंदवली होती आणि शाहरुखला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवर गेले होते. सुरुवातीला तर हे पोलीस शाहरुखचे फॅन आहेत आणि त्याला भेटायला आले आहेत असे त्याला वाटले होते. 

शाहरुखला पोलीस अटक करायला आलेत हे कळल्यावर शाहरुख त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेला होता आणि त्याला एक रात्र लॉकअपमध्ये घालवावी लागली होती. दुसऱ्या दिवशी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

टॅग्स :शाहरुख खान