Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानला होती हनुमानाच्या भूमिकेची ऑफर, पण दिला नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:17 IST

शाहरुख काही वर्षांपूवी एका हॉलिवूड सिनेमात हनुमानाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र अभिनेत्याने ती नाकारली.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. शाहरुखने साकारलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मग तो प्रेम मिळवण्यासाठी काहीही करणारा वेडा प्रियकर असो, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उतरणारा सैनिक असो अथवा बदला घेण्यासाठी जागा झालेला व्हिलन. अशोका या ऐतिहासिक भूमिकेतही शाहरुखला चाहत्यांची पसंती मिळाली होती. पण, शाहरुखला हनुमानाच्या भूमिकेत बघण्याची चाहत्यांची संधी मात्र हुकली. 

शाहरुख काही वर्षांपूवी एका हॉलिवूड सिनेमात हनुमानाची भूमिका ऑफर झाली होती. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक टोनी स्कॉट यांनी शाहरुखला हा रोल ऑफर केला होता. टोनी स्कॉट यांना हनुमानावर सिनेमा बनवायचा होता. शाहरुखला त्यांनी सिनेमाची कथाही ऐकवली होती. पण, अभिनेत्याने नकार दिला. तरण आदर्शला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने याबाबत भाष्य केलं होतं. तो म्हणाला, "टोनी स्कॉट यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा या जगात बॅटमॅन आणि सुपरमॅन नव्हते. तेव्हा भारतात हनुमानाच्या रुपात एक सुपरहिरो होता. हनुमानजींना त्यांना मॉर्डन सुपरहिरोसारखं इंटरनॅशनल मोठ्या पडद्यावर आणायचं होतं". 

"सिनेमातल्या मुख्य भूमिकेसाठी त्यांना एक सामान्य माणसासारखा दिसणारा अभिनेता हवा होता. युद्धादरम्यान त्याची शक्ती जागृत होईल आणि त्याची शेपूट बाहेर येईल, अशी कल्पना त्यांनी मांडली होती. ही खूप जुनी गोष्ट आहे. पण तेव्हा माझं इंग्रजी इतकं चांगलं नव्हतं की मी हॉलिवूडमध्ये काम करू शकेन. म्हणून मी नकार दिला होता", असंही शाहरुखने सांगितलं होतं. 

टॅग्स :शाहरुख खान