Join us  

व्हॅकेशनवेळी बिकीनीमध्ये लावली होती आग, मायदेशी परताच दिसला देसी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 10:57 AM

सारा अली खानने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने तिने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.

सारा अली खानने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली. लवकरच सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तूर्तास सारा कामातून ब्रेक घेऊन आई आणि भावासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसली. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी ती मालदीवला गेली होती.  व्हॅकेशन दरम्यानचे फोटो साराने इंस्टाग्रामवर शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. हे साराचे आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो आहेत, असे म्हणायलाही हरकत नाही. कारण कधी बिकनीमध्ये सेक्सी बॉडी फ्लॉन्ट करताना दिसली तर कधी, समुद्र किनाऱ्यावर केली धमाल. तसेच कधी ती फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आस्वाद घेताना दिसली.

या व्हॅकेशनवेळीची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसली. मालदीव्हजमध्ये तिचा ग्लॅमरस आणि तितकाच बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करताना दिसला. मात्र जेव्हा सारा मायदेशी परतली तेव्हा एअरपोर्टवर देसी अंदाजात दिसली. पंजाबी ड्रेसमध्ये पाहताच सोशल मीडियावर तिच्याविषयीही अनेक चर्चा रंगल्या. 

अनेकवेळा साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत असते. तिच्या सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी सारा सा-यांची फेव्हरेट बनत चालली आहे.आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने तिने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि सारा व कार्तिकच्या लव्हस्टोरीला ब्रेक लागला.काही दिवसांपूर्वी सारा व कार्तिकने आपल्या नात्यात ब्रेक घेतल्याची बातमी आली होती. कार्तिक व सारा आपआपल्या प्रोजेक्टमध्ये इतके बिझी आहेत की एकमेकांना वेळ देणे त्यांना अशक्य झाले होते.

टॅग्स :सारा अली खान