Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिम्पल ही नर्गिस यांची मुलगी आहे ही अफवा पसरल्यानंतर अशी होती सुनील दत्त आणि त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:31 IST

या चर्चेचा नर्गिस यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला होता याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

ठळक मुद्देराज आणि नर्गिस यांच्या अफेअरची अनेक वर्षं चर्चा झाली होती. त्या दोघांना एक अनौरस मुलगी असून ती डिम्पल असल्याची चर्चा बॉबी या चित्रपटानंतर झाली होती

डिम्पल कपाडियानेे बॉबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी त्यांचा मुलगा ऋषी कपूरला लाँच केले होते. पण या चित्रपटानंतर एक वेगळीच चर्चा मीडियात सुरू झाली.

बॉबी या चित्रपटात नायक नायिकेला सगळ्यात पहिल्यांदा भेटतो, त्यावेळी तिच्या हातात असलेले पीठ तिच्या केसाला लागते असे दाखवण्यात आले होते. राज कपूर आणि नर्गिस यांच्या आयुष्यातील हा खरा किस्सा असल्याचे म्हटले जाते. राज आणि नर्गिस यांच्या अफेअरची अनेक वर्षं चर्चा झाली होती. त्या दोघांना एक अनौरस मुलगी असून ती डिम्पल असल्याची चर्चा बॉबी या चित्रपटानंतर झाली होती.

या चर्चेचा नर्गिस यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला होता याविषयी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, अशाप्रकारच्या अफवा पसरवून लोकांना काय मिळते हे माहीत नाही. या सगळ्या अफवा सुरू झाल्यानंतर मी, माझे पती यांनी याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले होते. माझ्या मुली तर या गोष्टीवर अक्षरशः हसल्या होत्या. पण संजय या अफवेमुळे नाराज झाला होता. अशा चुकीच्या गोष्टींना महत्त्व द्यायचेच नाही असे आम्ही ठरवले होते. 

टॅग्स :नर्गिसडिम्पल कपाडियाराज कपूरसुनील दत्त