Join us

म्हणून माधुरी दीक्षितने घेतला होता अनिल कपूरसोबत काम न करण्याचा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:24 IST

असे काही झाले की, माधुरीने अचानक अनिल कपूरसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देअनिलच्या कुटुंबाला दु:ख होईल, असे मी काहीही करू इच्छित नाही, असे माधुरी एका मुलाखतीत म्हणाली होती. 

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी 90 च्या दशकातील हिट जोडी होती. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट चित्रपट दिले.  तेजाब, बेटा, राम लखन,  किशन कन्हैया,  पुकार, हिफाजत, परिंदा,  जमाई राजा, प्रतिकार सोबतच अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली. पण यानंतर असे काही झाले की, माधुरीने अचानक अनिल कपूरसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिने 18 वर्षे पाळला. होय, कारण य निर्णयानंतर 18 वर्षांनी ‘टोटल धमाल’ या सिनेमात ही जोडी पुन्हा एकत्र झळकली.

होय, ‘टोटल धमाल’ या सिनेमाआधी ‘पुकार’ हा अनिल व माधुरीचा अखेरचा सिनेमा होता. या चित्रपटानंतरच माधुरीने अनिलसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पण का? आज याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, एकत्र काम करता करता अनिल व माधुरी यांच्यांत चांगलीच मैत्री झाली होती. दोघेही सेटवर इतके गप्पा मारत, इतका वेळ सोबत घालवत की, त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. इतक्या की, या बातम्या अनिलची पत्नी सुनिताच्या कानापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही.

 अनिल व माधुरीच्या अफेअरच्या बातम्या सुनीता अस्वस्थ होती. एक दिवस सुनीता मुलांसोबत अनिलच्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचली. अनिल पत्नी व मुलांसोबत गप्पा मारण्यात रंगून गेलेत. नेमक्या त्याचक्षणी माधुरी तिथे पोहोचली. अनिल कपूरला कुटुंबासोबत पाहून तिला कळायचे ते कळले. होय, ही एक हॅपी फॅमिली आहे, हे माधुरीला कळले.

त्यानंतर माधुरीने म्हणे, अनिल कपूरपासून अंतर ठेवण्याचा आणि त्याच्यासोबत पुढे कुठल्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला.

अनिलच्या कुटुंबाला दु:ख होईल, असे मी काहीही करू इच्छित नाही, असे माधुरी एका मुलाखतीत म्हणाली होती. यानंतर माधुरीने अनिलसोबत काम करणे जवळजवळ बंद केले, दोघेही 2000 मध्ये राजकुमार संतोषींच्या ‘पुकार’ मध्ये अखेरचे झळकले होते. पुढे ही जोडी 2019 मध्ये ‘टोटल धमाल’मध्ये दिसली. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. 

 

 

टॅग्स :माधुरी दिक्षितअनिल कपूर