निमित्त होते, अवार्ड फंक्शनचे. अमिताभ व ऐश्वर्या दोघेही याठिकाणी पोहोचले. पण फंक्शननंतर अमिताभ व ऐश्वर्या मीडियासमोर आले आणि यादरम्यान ऐश्वर्याने अतिउत्साहाने अमिताभ यांचे वेलकम केले. माझे सासरेबुवा सगळ्यात बेस्ट (अर्थात यात काहीही अतिशयोक्ती नाही. अमिताभ बेस्ट होते आणि आहेतच.) आहेत, असे ऐश्वर्या यावेळी म्हणाली. पण यानंतर जे झाले त्याची कुणी कल्पनाही केली नसावी. ऐश्वर्याचे असे वागणे कदाचित अमिताभ यांना अनपेक्षित असावे. म्हणूनच, आराध्यासारखे वागणे बंद कर, असे अमिताभ ऐश्वर्याला म्हणाले. मीडियासमोर सास-याची ही प्रतिक्रिया कदाचित ऐश्वर्यालाही अपेक्षित नसावी. यानंतर ती जरा हिसमुसलीच. पण तिने हे हिरमुसणे चेहºयावर दिसू दिले नाही. शेवटी यालाच तर ‘अॅक्टर’ म्हणतात ना?
ALSO READ : आराध्या आणि अबरामच्या अॅन्युअल डे फंक्शनसाठी पोहोचले ऐश्वर्या राय अन् शाहरूख खान!
सध्या अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ याशिवाश ‘पॅडमॅन’, ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमांमध्ये बिझी आहेत.याशिवाय लवकरच ते नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या शूटींगला सुरूवात करणार आहेत. या सिनेमात ते नागपूरात ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे विजय बार्से यांची भूमिका साकारताना दिसतील. ऐश्वर्याचे म्हणाल तर ती ‘फन्ने खां’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राज कुमार राव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु असून येत्या नववर्षात हा चित्रपट रिलीज होणार आहे.