Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणतीही अभिनेत्रीवर नव्हे तर या व्यक्तीवर होते अक्षय कुमारचे पहिले क्रश, त्यानेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:00 IST

अक्षयने एका कार्यक्रमात याविषयी सांगितले असून त्याचे हे उत्तर ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरले नव्हते.

ठळक मुद्देअक्षयने सांगितले होते की, मी सात-आठ वर्षांचा असेन... त्यावेळी मला शिकवायला एक टीचर होत्या... त्या मला खूप आवडायच्या... शाळेत माझ्या बाजूला एक मुलगा बसायचा, त्याला देखील मी ही गोष्ट सांगितली होती.

अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे देशाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. या परिस्थितीत अनेकजण पुढे येऊन गरजूंना आर्थिक मदत करताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत केली आहे. अक्षय कुमारने तर पंतप्रधान सहाय्यक निधीत तब्बल २५ कोटींची मदत केली आहे.

अक्षय सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असून अनेक पटकथा देखील वाटत आहेत. आज अक्षय कुमारबद्दल एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अक्षयने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तू लहानपणी कोणाच्या प्रेमात पडला होतास का? असे त्याला या कार्यक्रमात विचारण्यात आले होते. त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्याने सांगितले होते की, मी अगदी लहान असताना एका व्यक्तीवर प्रचंड प्रेम करत होतो. अनेकांचे पहिले क्रश ही त्यांची टीचर असते. माझ्याबाबतीत देखील काहीसे असेच झाले होते. 

अक्षयने या कार्यक्रमात पुढे सांगितले होते की, मी सात-आठ वर्षांचा असेन... त्यावेळी मला शिकवायला एक टीचर होत्या... त्या मला खूप आवडायच्या... शाळेत माझ्या बाजूला एक मुलगा बसायचा, त्याला देखील मी ही गोष्ट सांगितली होती. त्याला मी सांगितले होते की, मला माझ्या या टीचर प्रचंड आवडतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करायला लागलो आहे आणि मला यांच्यासोबतच लग्न करायचे आहे. मला वाटत नाही की, या सगळ्यात माझी काही चुकी होती. कारण शालेय जीवनात तुम्ही अनेकवेळा तुमच्या टीचरच्या प्रेमात पडता, माझ्याबाबतीत देखील तसेच झाले होते.  

टॅग्स :अक्षय कुमार