Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे शाहरुख खानच्या पार्टीत आमिर खान घेऊन गेला होता जेवणाचा डब्बा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:41 IST

आमिर त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला तू पार्टीमध्ये गेल्यावर काय खातोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ठळक मुद्देमी नक्कीच जेवायला येईन असे मी त्यावेळी गौरीला सांगितले होते. तिथे गेल्यावर काही गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर जेवण वाढल्यानंतर गौरी मला जेवायला बोलवायला आली, त्यावर मी माझे घरचे जेवण आणले असल्याचे तिला सांगितले.

आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो. त्याने त्याच्या आजवरच्या भूमिकांसाठी कधी वजन कमी तर कधी जास्त केले आहे. दंगल या चित्रपटासाठी त्याने त्याच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली होती.

या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यात आपल्याला एकदम फिट आमिर पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर वय झालेला, पोट वाढलेला आमिर दिसला होता. आमिरने यावेळी त्याचे वर्कआऊटचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. याच चित्रपटाच्या दरम्यानचा एक किस्सा त्याने नुकताच सांगितला आहे.

आमिर त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच सतर्क असतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमिरला तू पार्टीमध्ये गेल्यावर काय खातोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आमिरने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने सांगितले होते की, मी जिथेही जातो, तिथे मी माझा जेवणाचा डबा सोबत घेऊन जातो आणि तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर तुम्ही शाहरुखला विचारा. टीम कूक शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत अमेरिकेतील काही मित्र देखील होते. त्यावेळी गौरीने मला देखील त्यांच्यासोबत घरी जेवणासाठी बोलावले होते.

मी नक्कीच जेवायला येईन असे मी त्यावेळी गौरीला सांगितले होते. तिथे गेल्यावर काही गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर जेवण वाढल्यानंतर गौरी मला जेवायला बोलवायला आली, त्यावर मी माझे घरचे जेवण आणले असल्याचे तिला सांगितले. त्यावर मी काहीतरी खावे असा गौरी सतत आग्रह करत होती. पण मी दंगलसाठी डाएटवर असल्याने मी केवळ माझ्या घरचे जेवण जेवतो असे मी तिला सांगितले. मी खूपच जास्त प्रमाणात माझ्यासाठी जेवण आले होते. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आमिरच्या या मुलाखतीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या चाहत्यांनी पोस्ट केला आहे. आमिरच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :शाहरुख खानआमिर खान