Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कशी असेल प्रभासची ‘मिस परफेक्ट’? वाचा प्रभासचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 10:15 IST

‘बाहुबली2’नंतर प्रभास लोकांचा सगळ्यात आवडता स्टार बनलाय. दिवसागणिक प्रभासच्या चाहत्यांची संख्या वाढते आहे. त्याच्या फिमेल फॅन्स तर प्रभासवर जीव ...

‘बाहुबली2’नंतर प्रभास लोकांचा सगळ्यात आवडता स्टार बनलाय. दिवसागणिक प्रभासच्या चाहत्यांची संख्या वाढते आहे. त्याच्या फिमेल फॅन्स तर प्रभासवर जीव ओवाळून टाकायला तयार आहेत. प्रभास अद्याप अविवाहीत आहे. त्यामुळे प्रभासची ‘मिस परफेक्ट’ कशी असणार, हा त्यातल्या त्यात सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. ‘बाहुबली2’ रिलीजनंतर प्रभास बोहल्यावर चढणार, असे मध्यंतरी कानावर आले होते. पण अद्याप प्रभासच्या घरी लग्नाच्या कुठल्याच हालचाली दिसत नसल्याने लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तूर्तास तरी प्रभास जिथे जाईल तिथे त्याला त्याच्या ‘मिस परफेक्ट’बद्दलच विचारले जात आहे. सध्या देवसेना उर्फ अनुष्का शेट्टीसोबतच्या प्रभासच्या लिंकअपच्या चर्चांही जोरावर आहेत. त्यामुळे प्रभासची लव्ह लाईफ आणि त्याचा लग्नाचा प्लान हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे.अलीकडे एका मुलाखतीत प्रभासला याचबद्दल विचारले गेले. तू लग्न टाळतो आहेस, हे खरे आहे का? असा प्रश्न प्रभासला विचारण्यात आला. यावर लाजरा प्रभास आणखीच लाजला. नाही...नाही....असे काहीही नाही, असे त्याने अगदी नम्रपणे सांगितले.ALSO READ : ​प्रभासमुळे अनुष्का शेट्टीचे लग्न होता होता राहिले!शूटींगमुळे लग्न लांबलेय, हे खरे आहे, असे त्याने सांगितले. घरात लगीनघाई सुरु झाली आहे का? असेही त्याला विचारण्यात आले. यावर प्रभासने ‘नाही’ असे उत्तर दिले. या मुलाखतीदरम्यान राणा डग्गुबतीही प्रभाससोबत होता. प्रभासचे ‘नाही’ असे उत्तर ऐकून त्याला कमालीचे आश्चर्य वाटले. त्याने लगेच प्रभासकडे बघत, होय, लगीनघाई सुरु आहे, हे मीही ऐकतो आहे, असे तो खट्याळपणे म्हणाला. प्रभासच्या ‘मिस परफेक्ट’बद्दल तुला काही आयडिया आहे का? असे मग राणालाच विचारण्यात आले. पण राणाने हात वर केलेत. मला कधीच ‘मिस परफेक्ट’बद्दल आयडिया असू शकत नाही, असे राणा म्हणाला. शेवटी हाच प्रश्न प्रभासकडे आला. प्रभास यावर काय म्हणाला माहितीयं. माझ्या ‘मिस परफेक्ट’बद्दलच्या कल्पना वेळेनुसार बदलत राहतात, असे प्रभास म्हणाला. आता प्रभासच्या या उत्तराचा तुम्हीच तो काय अर्थ लावा.