२४ नोव्हेंबरला बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांनी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्याशी संबंधित अनेक जुन्या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांचेही अनेक जुने व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यात त्या धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. अशाच एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या शेवटच्या पण अपूर्ण राहिलेल्या इच्छेचा उल्लेख केला आहे. त्यांची ती शेवटची इच्छा काय होती, जाणून घेऊया.
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा 'रजिया सुलतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधीक चर्चेत असल्यामुळे, अनेकांना वाटले की त्यांचे करिअर आता संपले आहे. १९८३ मध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा धर्मेंद्र यांना विचारण्यात आले की हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीचा शेवट होता का. तेव्हा उत्तरात धर्मेंद्र यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की, काही काळासाठी कामापासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला होता. ते म्हणाले होते, 'एक अभिनेता म्हणून, माझा विश्वास आहे की मी बूट घालून मरावे. याचा अर्थ असा होता की, धर्मेंद्र यांची इच्छा काम करत असतानाच मरण यावे अशी होती.
दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमी राहिले एक अंतर
एका मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी वयाच्या १९व्या वर्षी, म्हणजे १९५४ साली प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले होते. प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना सनी आणि बॉबी देओल हे दोन मुलगे आणि विजेता आणि अजीता या दोन मुली आहेत. त्यानंतर, २ मे १९८० रोजी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. असे मानले जाते की या दोन्ही कुटुंबांमध्ये नेहमी एक अंतर राहिले. धर्मेंद्र यांनी अनेकदा दोन्ही कुटुंबे एकत्र यावीत यासाठी प्रयत्न केले, पण सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे हे कधीही शक्य होऊ शकले नाही, असे म्हटले जाते.
लग्नानंतर हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घरी राहिल्या नाहीत...एका जुन्या मुलाखतीत हेमा मालिनी यांना अँकर विचारते की, तुम्ही फेमिनिझमचे खरे उदाहरण आहात, कारण तुम्ही लग्नानंतरही वेगळे आणि स्वतंत्र राहणे निवडले. मात्र, अँकरच्या या बोलण्यावर हेमा मालिनी म्हणतात की, ही माझी निवड नसून मजबूरी आहे, परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय आहे. हेमा मालिनी लग्नानंतर धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांच्या घरी राहिल्या नाहीत. त्या आपल्या मुलींसोबत एका वेगळ्या घरात राहिल्या. या व्हायरल मुलाखतीत त्या म्हणतात की, प्रत्येकजणांना हेच वाटते की पती-पत्नी एकत्र राहावे, त्यांची मुले सोबत असावी आणि ते एक 'हॅप्पी फॅमिली' असावे. मात्र, धर्मेंद्र प्रत्येक वेळी सोबत राहिले, त्यांनी प्रत्येक भूमिका निभावली आणि कोणालाही एकटे सोडले नाही. हेमा मालिनी यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांना धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.
आता पूर्ण होणार धर्मेंद्र यांचं 'शेवटचं स्वप्न'बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच त्यांच्या कवितांचे एक संकलन प्रकाशित होणार आहे. हा प्रोजेक्ट सनी देओलचे कुटुंब आणि हेमा मालिनी तसेच त्यांच्या मुलींच्या हस्ते सुरू केला जाईल. आपल्या कवितांच्या महत्त्वाविषयी बोलताना धर्मेंद्र एकदा म्हणाले होते की, "हा छंद म्हणून सुरू झाला होता... तुम्हाला माहित आहे, जेव्हा कधी माझ्या मनात कोणतीही ओळ यायची, तेव्हा मी ती लिहून घ्यायचो आणि नंतर ते एक अधिक उत्कट काम बनले. कविता लिहिणे हा माझा छंद, माझी नशा बनली आहे." धर्मेंद्र जिवंत असताना त्यांचे मुलगे सनी आणि बॉबी आणि मुली ईशा आणि अहाना त्यांना त्यांच्या कविता प्रकाशित करण्याची विनंती करत असत. परंतु धर्मेंद्र यांना नेहमी वाटायचे की त्यांच्या मनात कवितांच्या आणखी अनेक ओळी आहेत, ज्या त्यांना प्रकाशित करण्यापूर्वी लिहायच्या आहेत.
Web Summary : Dharmendra wished to work until his death. His dream project, a poetry collection, will be released posthumously with his family's support. He maintained separate homes for his two families, fulfilling responsibilities despite the distance. Hema Malini respected his first family's space.
Web Summary : धर्मेंद्र की इच्छा थी कि वे अपनी मृत्यु तक काम करें। उनका ड्रीम प्रोजेक्ट, एक कविता संग्रह, मरणोपरांत उनके परिवार के समर्थन से जारी किया जाएगा। उन्होंने अपने दो परिवारों के लिए अलग-अलग घर बनाए, दूरी के बावजूद जिम्मेदारियों को पूरा किया। हेमा मालिनी ने उनके पहले परिवार की जगह का सम्मान किया।