Join us  

What..!! सर्वकाही विसरुन एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसली दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 7:18 PM

दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिनसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawani Hai Deewani). या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा खास क्षण साजरा करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एकत्र आली होती. या काळातील काही खास छायाचित्रे चित्रपटाची मुख्य नायिका दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रत्येकजण खूप आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर दिसताच लगेच व्हायरल झाले आहेत.

दीपिका पादुकोणने बुधवारी संध्याकाळचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे शेअर करत दीपिकाने पोस्टमध्ये लिहिले, 'यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है, एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार।' वास्तविक, हा 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाचा डायलॉग आहे, जो चित्रपट रिलीज झाल्यापासून खूप लोकप्रिय आहे. या पोस्टमध्ये दीपिकाने तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दीपिका सोबत रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कल्की दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका आणि रणबीर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून मस्तीच्या मूडमध्ये हसताना दिसत आहेत.

चाहत्यांना दीपिका-रणबीरला पुन्हा एकत्र पाहायचंय रुपेरी पडद्यावर

दोन्ही फोटोंमध्ये दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर खूप जवळ आहेत. अशा परिस्थितीत नेटकरी दोघांचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, दीपिका पादुकोणने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर सदस्य दिसत आहेत. दीपिकाचे हे फोटो पाहून लोक या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल विचारत आहेत. या पोस्टमध्ये दुसऱ्या भागाविषयी काहीही सांगितले नसले तरी दीपिका-रणबीरच्या चाहत्यांना त्यांची आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायची आहे. त्याचा दुसरा भाग बनणार की नाही हे निर्मातेच सांगू शकतील.

'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट करण जोहरने निर्मित केला होता. त्याचवेळी हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट ४ कॉलेज मित्रांच्या मैत्रीवर आधारीत आहे, जे अनेक बदलांसह अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात. या चित्रपटातील संवाद आणि गाणी चांगलीच गाजली. 'बलम पिचकारी' आणि 'बदतमीज दिल' या चित्रपटातील गाणी आजही लोकांना आवडतात.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग