Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चाहत्यांनी घेरल्यावर कॅटने केले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 21:06 IST

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही पापाराझींशी तशीही फटकून वागते. खासगी आयुष्यात कुणीही कुठल्याही प्रकारची दखल दिलेली कॅटला आवडत नाही. त्यामुळेच चाहत्यांसोबत कॅट फार क्वचित फोटो काढताना दिसते. मात्र ‘ड्रीम टीम कंसर्ट’साठी अमेरिकेतील पोहोचलेल्या कॅटने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

बॉलिवूड अभिनेत्री  कॅटरिना कैफ ही पापाराझींशी तशीही फटकून वागते. खासगी आयुष्यात कुणीही कुठल्याही प्रकारची दखल दिलेली कॅटला आवडत नाही. त्यामुळेच चाहत्यांसोबत कॅट फार क्वचित फोटो काढताना दिसते. मात्र ‘ड्रीम टीम कंसर्ट’साठी अमेरिकेतील पोहोचलेल्या कॅटने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. कॅटने हॉटेलात पाय ठेवला आणि चाहत्यांनी तिला एकच गराडा घातला. खरे तर चाहत्यांसोबत फोटोसेशन करणे कॅटचा स्वभाव नाही. पण याठिकाणी कॅटने अतिशय संयमाने चाहत्यांसोबत पोझ दिली आणि चाहत्यांचे समाधान झाल्यावर तेवढ्याच शांततेत आपल्या खोलीकडे चालती झाली. कॅटरिना, करण जोहर, वरूण धवन,आलिया भट, परिणीती चोप्रा आणि बादशाह असे अनेक स्टार्स ‘ड्रीम टीम टूर’वर निघाले आहेत.