तसे पाहाल, तर कॅटरिना केवळ सलमानच्याच नाही तर त्याच्या कुटुंबाच्याही क्लोज आहे. विशेषत: सलमानच्या बहिणींच्या. त्यामुळेच सलमानच्या घरी कुठलेही फंक्शन असो, कॅटरिना तिथे असतेच असते.
कॅटरिना व सलमानचा ‘टायगर जिंदा है’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. कॅट व सलमानचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहायला मिळणार म्हणून चाहते खूश आहेत. केवळ इतकेच नाही तर या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स लवकरात लवकर रिअल लाईफ रोमान्समध्ये बदलावा, अशीही चाहत्यांची इच्छा आहे. यंदाच्या आयफा अवार्ड सोहळ्यात आयफाच्या स्टेजवर सर्वाधिक कॅट अन् सलमानचाच जलवा होता. केवळ जलवा नाही तर दोघांचीही केमिस्ट्रीही बघण्यासारखी होती. सलमानने खास तिला आयफाच्या स्टेजवरून कॅटला बर्थ डे विश केले होते. केवळ इतकेच नाही तर तिच्यासाठी गाणेही गायले होते. यानंतर गत महिन्यात मुंबईत एका इव्हेंटमध्ये सलमान व कॅटरिना सोबत दिसले होते. आतली खबर सांगायची तर सलमान कॅट आहे म्हणून तर कॅटने सलमान आहे म्हणून, या इव्हेंटला होकार दिला होता. त्याआधी मेहबूब स्टुडिओत सलमान कॅटला तिच्या कारपर्यंत सोडायला गेला होता.