WEDDING ANNIVERSARY TRAILER: नाना पाटेकरांचा असा रोमॅण्टिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 12:27 IST
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त या वर्षी आपल्याला नानांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. कारण आगामी ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ या चित्रपटात नाना चक्क माही गिलसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत.
WEDDING ANNIVERSARY TRAILER: नाना पाटेकरांचा असा रोमॅण्टिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल
‘नटसम्राट’ नाना पाटेकर गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, अधूनमधून ते प्रेक्ष्रकांना सरप्राईज करत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्त या वर्षी आपल्याला नानांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. कारण आगामी ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ या चित्रपटात नाना माही गिलसोबत चक्क रोमान्स करताना दिसणार आहेत.मागच्या वर्षी घोषणा केल्यापासून या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. नुकतेच सिनेमाचे ट्रेलर लाँच करण्यात आले असून त्यामध्ये गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात नाना-माही अशी आगळीवेगळी जोडी प्रेम, नाते, भूतकाळ, लग्न याविषयी रोमॅण्टिक गप्पा मारण्यात मग्न दिसतात.चित्रपटाची कथा म्हणजे माही आणि तिचा पती त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस गोव्यात साजरा करण्याचा प्लॅन बनवतात. मात्र गडबड अशी होते की, माही एक दिवस आधीच गोव्यात पोहचते. एकटी राहत असताना तिला नानांचे पात्र भेटते. त्यांच्या काव्यात्मक बोलण्याने माही त्यांच्या आकर्षित होते. मात्र, नाना जेव्हा सलगी वाढवू पाहतात तेव्हा ती त्यांना फटकारून घराबाहेर काढते आणि चित्रपट रोमॅण्टिक ट्रॅकवरून हॉरर-थ्रीलर असा गिअर बदलतो. आतापर्यंत शांत-निर्मळ मनाचा लेखक भासणारा नाना एक गुढ-रहस्यमयी भूमिकेत दिसतो. माहीसोबत अनेक अलौकिक घटना घडत जातात आणि रहस्य आणखीच गुढ होत जाते.दिग्दर्शक सुधांशू झा सांगतो की, ‘ही थ्रीलर-हॉरर लव्ह स्टोरी आहे. पे्रक्षकांना नाना आणि माही एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहेत.’ चित्रपटाची शूटींग गोव्याच्या प्रत्यक्ष लोकेशन्सवर झालेली असून यामध्ये प्रियांशू चॅटर्जीदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.तुम्हीदेखील ट्रेलर पाहुन आम्हाला कळवा की, नानांचा असा अनोखा रोमॅण्टिक अंदजा तुम्हाला कसा वाटला...