Join us

WEDDING Anniversary: म्हणून कांगारूच्या देशात अनुष्का साजरा करणार लग्नाचा पहिला वाढदिवस,हे आहे खास कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:00 IST

2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा दोघं एकत्र आले. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एकमेकांना ते डेट करु लागले.

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली रेशीमगाठीत अडकले. लग्न बंधनात अडकल्यापासून दोघांना एकमेकांसाठी वेळ देताना कसरत करावी लागत आहे. विराट भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यात बिझी आहे. तर दुसरीकडे अनुष्का शर्मा तिच्या सिनेमांच्या शुटिंग कामात अडकली आहे. अशा बिझी शेड्युअलमध्ये एकमेकांना वेळे देणं आणि त्याची सांगड घालणं दोघांसाठी तितकंसं सोपं राहिलेलं नाही. मात्र तरी जीवनातील काही विशेष प्रसंगी त्यांनी आजवर एकमेकांसाठी वेळ राखून ठेवला. त्यातच येत्या ११ डिसेंबरला विराट-अनुष्का लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे.

लग्नाचा पहिला वाढदिवस एकत्र साजरा करण्याचे अनुष्का-विराटने खास प्लान आखले आहेत. सध्या अनुष्का तिच्या आगामी 'झीरो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मात्र यांतून वेळ काढत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे आपल्या पतीसह लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या सेलिब्रेशनचे प्लान्स अनुष्काने महिनाभर आधीपासून ठरवले होते आणि याची कल्पना तिने 'झीरो' सिनेमाच्या टीमलाही दिली होती. 

६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे.हा सामना १० डिसेंबरपर्यंत असेल. त्यामुळे ११ डिसेंबरला दोघांनाही आपल्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करता येणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच प्रतीक्षा असेल ती या क्यूट कपलच्या सेलिब्रेशनच्या फोटोंची.

2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा दोघं एकत्र आले. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एकमेकांना ते डेट करु लागले. सुरुवातीपासूनच विराटचं अनुष्कावर जीवापाड प्रेम होतं. अनुष्काबाबत विराट जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. आपल्या लेडी लव्हसाठी विराटने कशाचीही पर्वा केली नाही. अनुष्काचा अपमान करणा-याचा तर त्याने थेट शिवीगाळ करत पानउतारा करायलाही मागे पुढे पाहिलं नाही.

अनेकदा तर अनुष्काच्या प्रेमासाठी त्याने क्रिकेटच्या नियमांचंही उल्लंघन केलं. एक क्षण असा होता की अनुष्काच्या प्रेमात तो इतका बुडाला की त्याने कुणाचाही विचार केला नाही. अनुष्कासाठी त्याने थेट एका पत्रकाराशी पंगा घेतला होता. 2015 क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान सराव करुन विराट ड्रेसिंग रुमकडे जात होता. त्यावेळी त्याची नजर एका पत्रकारावर पडली. विराट त्याच्या जवळ गेला आणि त्याच्यावर भडकला. एका दैनिकात अनुष्का संदर्भात एक वृत्त प्रसिद्ध झालं होते. ते वृत्त त्या पत्रकाराने दिले असा विराटचा समज झाला होता. मात्र सत्य परिस्थिती समजल्यावर विराटने त्या पत्रकाराची माफी मागितली होती. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली