Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न आणि प्रभासशी...कधीच नाही, अनुष्का शेट्टीने केले स्पष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 13:54 IST

‘बाहुबली-२’मध्ये बाहुबली प्रभासच्या पत्नीची भूमिका रंगविणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी हिने प्रभाससोबतच्या लग्नाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला आहे. अनुष्काने रोखठोकपणे ...

‘बाहुबली-२’मध्ये बाहुबली प्रभासच्या पत्नीची भूमिका रंगविणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी हिने प्रभाससोबतच्या लग्नाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला आहे. अनुष्काने रोखठोकपणे याविषयीचा खुलासा करताना म्हटले की, ‘लग्न आणि प्रभासशी... कधीच नाही.’ त्याचबरोबर तिने प्रभाससोबतच्या तिच्या लिंक-अपविषयीच्या चर्चा पसरविणाºया व्यक्तीविषयीही नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास अनुष्काबरोबरच लग्न करणार, याविषयीच्या चर्चा रंगविल्या जात आहे. बहुधा त्यांच्या चाहत्यांचीही हिच अपेक्षा असल्याने या दोघांमधील लग्नाच्या चर्चांना अक्षरश: उधाण आले आहे. तब्बल सहा हजार लग्नाचे प्रस्ताव नाकारणारा प्रभास आता बोहल्यावर चढण्यास तयार असल्याने त्याची मिसेस परफेक्ट कोण असेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. त्याच्या चाहत्यांसाठी तर ‘कट्टपाने बाहुबलीला का मारले’ या सिक्रेट प्रश्नाप्रमाणेच त्याच्या लग्नाचे कोडे निर्माण झाले होते. त्यातच एका उद्योगपतीच्या नातीबरोबरचा प्रभासचा विवाह रद्द झाल्याने प्रभास अनुष्काबरोबरच विवाहबद्ध होणार, असे निश्चित समजले जात होते. मात्र, आता अनुष्काने याविषयीचा खुलासा करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अनुष्काने म्हटले की, ‘आमच्या दोघांमध्ये तुम्ही समजता तसे काहीच नाही. फक्त खूप वर्ष एकत्र काम केल्याने आमची ट्यूनिंग जमली, त्यामुळे अशाप्रकारच्या चर्चा निराधार असल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच या दोघांमधील लिंक-अपच्या चर्चा ‘बाहुबली’च्या टीममधीलच कुणी तरी पसरविल्याचे तिच्या कानावर आल्याने याविषयी तिने जाहीर नाराजीही व्यक्त केली. अनुष्काच्या या स्पष्टीकरणामुळे या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रेमसंबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रभास सध्या अमेरिकेत सुट्या एन्जॉय करीत असून, लवकरच तो भारतात परतणार आहे. भारतात आल्यानंतर तो बहुचर्चित ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटातही प्रेक्षकांना प्रभास आणि अनुष्काची जोडी बघावयास मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटात प्रभाससोबत कॅटरिना कैफ काम करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता कॅटरिनाची जागा आता अनुष्काने घेतल्याने या दोघांची पुन्हा एकदा पडद्यावर केमिस्ट्री बघावयास मिळणार आहे.