Join us

WATCH : ​जेव्हा बाबा रामदेव रणवीर सिंगला करतात ‘चीतपट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:29 IST

त्याला त्याच्याच गेममध्ये हरवणारी व्यक्ती भेटली आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नूसन खुद्द योग गुरू बाबा रामदेव आहेत.

रणवीर सिंग म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि उत्साहाचा स्रोत आहे. त्याची एनर्जी लेव्हल मॅच करणे प्रत्येकालाच जमेल असे नाही. तो जाईल तेथे त्याच्या गंमतीशीर क्लृप्त्यांनी तो मनोरंजन करून सर्वांची मने जिंकतो. तो जेव्हा येतो तेव्हा फक्त तोच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.पण त्याला त्याच्याच गेममध्ये हरवणारी व्यक्ती भेटली आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नूसन खुद्द योग गुरू बाबा रामदेव आहेत. राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमात हे दोघे सहभागी झाले होते. रणवीरने बाबा रामदेव यांना डान्स आणि व्यायामाचे चॅलेंज दिले.रणवीरला वाटले आपण डान्समध्ये बाबांना सहज हरवू पण हा त्याचा गैरसमज होता. योगा गुरूंनी ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘मल्हारी’ गाण्यावर डान्स आणि व्यायामाचे असे काही मिश्रण सादर केले की, दम लागून थकलेला रणवीर बघतच राहिला. बााबांचा स्टॅमिना पाहून उपस्थितांनीसुद्धा त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.                                         शेवटी रामदेव बाबांनी रणवीरला खांद्यावर उचलून तालमीतल्या पहिलवानाप्रमाणे चितपट केले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील विस्मयकारक भावच सर्वच काही सांगून जातात. पुश-अप्स, योगासने आणि डान्स स्टेप्स अशा तिन्ही प्रकारात बााब सरस ठरल्यावर त्यांनी रणवीरला स्टॅमिना कमी असण्याबद्दल प्रश्न केला.रणवीरच काय इतर कोणीच हा विचार केला नसेल की, एक दिवस असा येईल की, त्याला स्वत:ला कोणी तरी स्टॅमिना कमी का आहे म्हणून विचारेल. बाबांच्या हातून झालेला पराभव स्वीकारत त्याने मनापासून हात जोडले. स्टेजवर रणवीरला सोडून बाबा आपल्या जागेवर परत जाऊन बसल्यावर उपस्थितांनी उभे राहून टाळ्या वाजवत अभिनंदन केले.रणवीरसाठी आमचे केवळ एकच म्हणने आहे, डोन्ट अंडरइस्टेमेट रामदेव बाबा!