watch video : भारती सिंग व हर्ष लिंबाचियाचे रोमॅन्टिक वेडिंग साँग एकदा पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 13:06 IST
होय, भारती व हर्षचे स्व:चे वेडिंग साँग. या वेडिंग साँगमध्ये भारती व हर्षचा रोमॅन्टिक अंदाज बघण्यासारखा आहे.
watch video : भारती सिंग व हर्ष लिंबाचियाचे रोमॅन्टिक वेडिंग साँग एकदा पाहाच!!
आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी कॉमेडियन भारती सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. येत्या ३ डिसेंबरला बॉयफ्रेन्ड हर्ष लिंबाचियासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. गोव्यात रंगणा-या भारती व हर्षच्या या लग्नसोहळ्याचे इनसाईड फोटो पाहायला साहजिकच चाहते उत्सूक आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. यातील ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ पोझमधील भारती अन् हर्षचा फोटो तर फारच मनोरंजक होता. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’च्या धर्तीवर ‘दुल्हा हम ले जायेंगे’असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले होते. आता भारती व हर्षच्या या प्री-वेडिंग फोटोसारखेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काय तर भारती व हर्षचे स्व:चे वेडिंग साँग. होय, या वेडिंग साँगमध्ये भारती व हर्षचा रोमॅन्टिक अंदाज बघण्यासारखा आहे. ‘भारती का रोमान्स’,‘भारती की बारात’ या नावाने भारती व हर्षच्या वेडिंग साँगचा व्हिडिओ वेगात व्हायरल होतो आहे. भारतीसाठी गिटार वाजवणारा हर्ष, तिला खळखळून हसवणारा, तिच्यासोबत काही रोमॅन्टिक क्षण घालवणारा हर्ष हे सगळे पाहणे, भारतीच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे एक वेगळा अनुभव असेल. हा व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.ALSO READ : भारती सिंग व हर्ष लिंबाचियाच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो आहेत खास...हसून हसून दुखेल पोट!भारती व हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्नानंतर हे कपल युरोपमध्ये हनीमूनला जाणार आहे. दोघेही २० ते २५ दिवस युरोपातील वेगवेगळ्या शहरात फिरणार आहेत. भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे आहेत. या सगळ्यांना भारती स्वत: जाऊन आमंत्रणं देणार आहे. भारती गेल्या आठ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्यामुळे तिने लग्नानंतरचा काही काळ केवळ तिच्या पतीसोबत घालवायचा ठरवला आहे. लग्नानंतर एक महिन्यांनी म्हणजेच जानेवारीत ती पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे.