Join us

रजनीकांतच बॉक्स ऑफिसचा राजा! हृतिकच्या 'War 2' आणि 'Coolie'च्या कमाईत फक्त एवढाच फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:11 IST

'वॉर २' आणि 'कुली'मध्ये कांटे की टक्कर! हृतिक रोशन की रजनीकांत, कोण ठरणार बॉक्स ऑफिस किंग?

ज्या दोन सिनेमांच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते ते 'वॉर २' आणि कुली हे बिग बजेट सिनेमे १४ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला. 'वॉर २'मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. तर सुपस्टार रजनीकांत यांचा कुली सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'वॉर २' आणि कुली या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर कांटे की टक्कर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर २' हा सिनेमा फूल अॅक्शन पॅक सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींची कमाई केली. 'वॉर २'चे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. शुक्रवारी सुट्टी असल्याने दुसऱ्या दिवशीही सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 'वॉर २'ने शुक्रवारी ५६.३५ कोटींचा गल्ला जमवला. 'वॉर २'ने दोन दिवसांतच १०८ कोटींचा बिजनेस केला. 

'वॉर २'ला रजनीकांत यांचा 'कुली' चांगलीच टक्कर देत आहे. दोन्ही सिनेमांची तुलना केल्यास रजनीकांतच बॉक्स ऑफिसचा किंग ठरत आहेत. 'वॉर २' आणि कुलीच्या कमाईत फक्त काहीच लाखांचा फरक आहे. 'कुली' सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ६५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने ५३.५० कोटी कमावले. दोनच दिवसांत 'कुली'ने ११८.५० रुपयांचा बिजनेस केला आहे. आता शनिवार-रविवारी 'कुली' आणि 'वॉर २' किती कमाई करतात हे पाहावं लागेल.  

टॅग्स :रजनीकांतहृतिक रोशनज्युनिअर एनटीआरबॉक्स ऑफिस कलेक्शन