साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मेगास्टार एका बहुभाषिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे- 'वृषभा'. एव्हीएस स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. AVS स्टुडिओने याची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट वडील-मुलाच्या कथेवर आधारित असेल. चित्रपटाचे चित्रीकरण मल्याळम आणि तेलुगू भाषेत होणार आहे. त्याचवेळी, ते तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये डब केले जाईल.
तेलुगू स्टारलाही कास्ट करण्याची तयारीनंदा किशोर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात प्रेम आणि बदला या भावना दाखवण्यात येणार आहेत. अनेक सुपरहिट मल्याळम चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध करणारे मोहनलाल या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माते चित्रपटात मोहनलाल यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी एका मोठ्या तेलगू स्टारला कास्ट करण्याची तयारी करत आहेत.
पाच वर्षांपासून सुरु आहे काम या चित्रपटाबद्दल मोहनलाल सांगतात की, स्क्रिप्ट ऐकून त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, हा चित्रपट एका वडील-मुलाच्या जोडीवर आधारित आहे.