Join us

​कंगना व शाहीद यांच्यातील वाद विकोपाला! असा झाला परिणाम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 11:40 IST

हृतिक रोशनसोबतचा कंगना राणौतचा कायदेशीर वाद चांगलाच चर्चेत होता. हा वाद शमतो ना शमतो तोच कंगनाचे आणखी एका अभिनेत्याशी ...

हृतिक रोशनसोबतचा कंगना राणौतचा कायदेशीर वाद चांगलाच चर्चेत होता. हा वाद शमतो ना शमतो तोच कंगनाचे आणखी एका अभिनेत्याशी खटके उडायला सुरुवात झालीय. हा अभिनेता म्हणजे शाहीद कपूर. होय, ‘रंगून’मध्ये कंगना व शाहीद लीड रोलमध्ये आहेत. ‘रंगून’च्याच सेटवर कंगना आणि शाहीद यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली. आता हा वाद विकोपाला गेल्याची बातमी आहे. इतका की ‘रंगून’च्या प्रमोशनवर त्याचा परिणाम पडायला लागला आहे.खरे तर हेडलाइन्समध्ये राहणे कंगनाला फार आवडते. मात्र या हेडलाईन्स बहुतेकदा तिने ओढवून घेतलेल्या वादासंदर्भात असतात. वाद आणि कंगना हे जणू अलीकडे समीकरण झाले आहे. आता या वादात आणखी एकाची भर पडली आहे. कुठल्याशा कारणावरून कंगना व शाहीदमध्ये बिनसल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी आली होती. तेव्हापासून हा वाद असाच धुमसत होता. ‘रंगून’च्या सेटवर एकमेकांसोबतचे सीन्स सोडले तर हे दोघेही एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नसत. सीन्स संपतो ना संपतो तोच हे दोघे आपआपल्या व्हॅनिटीमध्ये पळायचे. खरे तर हा वाद इतक्या महिन्यानंतर निवळला असावा, असाच आमचा अंदाज होता. पण आमचा हा अंदाज साफ चुकला. कंगना व शाहीदमधील भांडण मिटण्याऐवजी आणखी वाढले आहे. त्यामुळेच ‘रंगून’च्या एकत्र  प्रमोशनला दोघांनीही नकार दिला आहे. कंगनासोबत आपण प्रमोशन करणार नाही. त्यामुळे ती माझ्यासोबत नसेल, अशापद्धतीने प्रमोशन प्लान करा, असे शाहीदने मेकर्सला स्पष्टपणे सांगितल्याचे कळतेय. एकीकडे कंगना व शाहीदमधील कोल्ड वॉर रंगतेय. पण या सगळ्यात एक गोष्ट आश्चर्यकारक आहे. ती म्हणजे सैफ अली खान या वादावर चांगलीच चुप्पी साधून आहे. ‘रंगून’मध्ये सैफही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण कदाचित आपल्या को-स्टार्सच्या भांडणात उगीच नाक खुपसायचे नाही, असे त्याने ठरवलेले दिसतेय. आता या वादावर कसा तोडगा निघतो, ते बघूच!