Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर: द रिव्हेंज' पाहणाऱ्या प्रेक्षकांची तुलना थेट जर्मनीतील 'नाझीं'शी, विशाल भारद्वाज झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:00 IST

विशाल भारद्वाज हे 'हैदर' आणि 'ओंकारा' सारख्या वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात.

आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने सुरु केलेली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी अजूनही सुरुच आहे. जागतिक स्तरावर या सिनेमानं १६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं तर आदित्य धरनं केलेल्या दिग्दर्शनाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. एकिकडे चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत असताना काही लोकांनी 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट एक प्रपोगंडा असल्याचं म्हटलं. अशातच आता 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहणाऱ्या प्रेक्षकांची तुलना थेट जर्मनीतील 'नाझीं'शी करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टला विशाल भारद्वाज यांनी 'लाईक' केल्याचा दावा केला जात आहे. या एका कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

नुकतंच सोशल मीडियावर एक 'रील' व्हायरल झालं, ज्यामध्ये 'धुरंधर'च्या चाहत्यांची तुलना 'नाझी' विचारसरणीच्या लोकांशी करण्यात आली होती. विशाल भारद्वाज यांनी या वादग्रस्त रीलला 'लाईक' केल्याचा स्क्रीनशॉट 'X' (ट्विटर) वर व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटलं. हा स्क्रीनशॉट समोर येताच नेटकऱ्यांनी विशाल भारद्वाज यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 

एका युजरनं लिहिलं, "इतका टोकाचा मत्सर कशासाठी? चित्रपट चालला तर तो प्रेक्षकांचा नाझीवाद कसा होऊ शकतो?" तर दुसऱ्याने त्यांच्या अलीकडील 'O Romeo' या चित्रपटाच्या अपयशावर बोट ठेवत टिप्पणी केली, "'O Romeo' चं एकूण कलेक्शन हे 'धुरंधर २' च्या केवळ 'पेड प्रिव्ह्यू'च्या कमाईइतकं आहे. हा केवळ हेव्यातून आलेला राग आहे". अद्याप विशाल भारद्वाज यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशाल भारद्वाज हे 'हैदर' आणि 'ओंकारा' सारख्या वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखले जातात. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar' Viewers Compared to Nazis; Vishal Bhardwaj Faces Backlash

Web Summary : Vishal Bhardwaj faces criticism for liking a post comparing 'Dhurandhar: The Revenge' viewers to Nazis. The film's success sparks debate, with some labeling it propaganda. Bhardwaj's silence fuels the controversy after the viral post surfaced.
टॅग्स :विशाल भारद्वाजधुरंधर सिनेमा