Join us
Daily Top 2Weekly Top 5

Virat Kohli ची बहीण दिसते खूपच सुंदर, सौंदर्यात देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:49 IST

Virat Kohli: विराट कोहलीच्या बहिणीबद्दल फारसे कुणाला माहित नाही. त्याची बहिण दिसायलादेखील खूप सुंदर आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू म्हणून विराट कोहली (Virat Kohli) प्रसिद्ध आहे. एक दमदार फलंदाज असण्यासोबतच तो बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma)चा पती देखील आहे. एवढेच नाही तर विराट खूप श्रीमंत आहे, त्याने केवळ खेळाच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. आज तो कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. विराट कोहलीच्या बहिणीबद्दल फारसे कुणाला माहित नाही. त्याच्या बहिणीचे नाव भावना कोहली आहे आणि ती दिसायलादेखील खूप सुंदर आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय कपल आहे. त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव वामिका आहे. पण आज आम्ही अनुष्काबद्दल नाही तर विराट कोहलीची बहीण भावना कोहलीबद्दल सांगणार आहोत. विराट कोहलीच्या बहिणीचे नाव भावना कोहली आहे.

विराटचं भावनावर खूप प्रेम आहे, भाऊ-बहिणीचं नातंही वेळोवेळी पाहायला मिळतं. ती काय करते हे कोणालाच माहीत नाही. भावना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो इंस्टाग्रामवरही शेअर करते.

विराट कोहलीची बहीण भावना कोहलीच्या सौंदर्याबद्दल बोलायचे तर भावना कोहली खूपच सुंदर आहे आणि तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्रीदेखील फिक्या पडतील. भावना कोहलीला प्रसिद्धीझोतात राहायला अजिबात आवडत नाही. भावना एक बिझनेस वुमन आहे. तिचे लग्न संजय धिंग्रासोबत झाले असून ती दोन मुलांची आई आहे. भावना आणि अनुष्कामध्येदेखील खूप छान बाँडिंग आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा