Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ महिला क्रिकेटरने विराट कोहलीला घातली होती लग्नाची मागणी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:59 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न करताच अनेक तरुणींचे मनं तुटली यात शंका ...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न करताच अनेक तरुणींचे मनं तुटली यात शंका नाही. कारण जगभरातील कित्येक तरुणी विराटवर फिदा होत्या. कोणाला विराट बॉयफ्रेंड म्हणून तर कोणाला तो लाइफ पार्टनर म्हणून हवा होता. कित्येक तरुणींनी तर विराटला ‘मॅरी मी’ म्हणत लग्नाची आॅफरही दिली होती. त्यातीलच एक नाव इग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वेट हिचे आहे. होय, डॅनियलने तीन वर्षांपूर्वी विराट कोहलीला लग्नाची जाहीरपणे आॅफर दिली होती. मात्र विराटचे मन सुरुवातीपासूनच ‘फिरंगी’ नव्हे तर देशी अनुष्का शर्मावर जडले होते. त्यामुळेच त्याने गेल्या सोमवारी इटली येथे अनुष्कासोबत अतिशय शानदार अशा सोहळ्यात लगीनगाठ बांधली. 
 
डॅनियल वेटने ४ एप्रिल २०१४ रोजी एक ट्विट करून लिहिले होते की, ‘कोहली मॅरी मी’ त्यावेळी डॅनियलचे हे ट्विट चांगलेच चर्चिले गेले होते. अनेकांना विराट या ट्विटला काय उत्तर देतो याविषयी उत्सुकता लागली होती. परंतु विराट अगोदरच त्याचे मन अनुष्काला देऊन बसला असल्याने त्याने डॅनियलची ही आॅफर त्यावेळी फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. दरम्यान, आता विराट आणि अनुष्का विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर पुन्हा एकदा डॅनियल वेटने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ‘अभिनंदन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा’ यावेळी डॅनियलने तिच्या ट्विटमध्ये काही स्माइलिंग इमोजी आणि वेडिंग रिंगही पोस्ट केल्या. 



डॅनियल इग्लंड महिला क्रिकेट संघातील आॅलराउंडर खेळाडून असून, विराट कोहलीची जबरदस्त फॅन आहे. त्यामुळेच तिला जेव्हा-केव्हा संधी मिळते तेव्हा ती विराट कोहलीचे गुणगाण गात असते. दरम्यान, विराटने एकदा डॅनियलला बॅट गिफ्ट केली होती. डॅनियलने २०१० मध्ये मुंबई येथे झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या क्रिकेट करिअरला सुरूवात केली.