विराट कोहलीने ३४ वे शतक झळकविताच पत्नी अनुष्का शर्माने पतीचे असे केले कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 19:26 IST
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसºया एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करताना ३४ वे शतक झळकाविले. याचे पत्नी अनुष्का शर्माने चांगलेच सेलिब्रेशन केले.
विराट कोहलीने ३४ वे शतक झळकविताच पत्नी अनुष्का शर्माने पतीचे असे केले कौतुक!
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने जबरदस्त आघाडी घेतली आहे. मालिकेत सलग तीन सामने जिंकून भारत आघाडीवर असून, या यशात कर्णधार विराट कोहली याचा मोलाचा वाटा आहे. तिसºया एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या नावाला साजेशी १६० धावांची खेळी करताना विजयश्री खेचून आणली. विराटच्या फलंदाजीत प्रत्येक चौकार अन् छटकार बघण्यासारखा होता. हा सामना त्याची पत्नी अनुष्का शर्माने खूप एन्जॉय केला. जेव्हा विराटने ३४ वे शतक झळकाविले तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून विराटप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर पती विराट फलंदाजी करतानाचा एक फोटो शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘व्हाट अ गाय १००’ असे लिहिले. त्यात दिलच्या आकाराच्या इमोजीचाही वापर केला. नुकतेच अनुष्काच्या आगामी ‘परी’ या हॉररपटाचा तिसरा टीजर रिलीज करण्यात आला. हा टीजर बुधवारी सायंकाळी रिलीज करण्यात आला. विराटनेही पत्नीच्या टीजरचे कौतुक करताना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विराट अनुष्काला प्रोत्साहित करताना बघावयास मिळत आहे. आपल्या पोस्टमध्ये ‘परी’चा टीजर शेअर करताना विराटने लिहिले की, ‘रिमायंडर... हे काही फेरीटेल नाही, परी टीजर लव इट’ दरम्यान, ‘परी’ या चित्रपटात अनुष्का शर्मा एक वॅम्प बनली आहे. तिचा हा चित्रपट अंगावर शहारे आणणारा असून, २ मार्च रोजी रिलीज होणार आहे. काही वेळापूर्वीच चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.