Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानला मागे टाकत विराट कोहली बनला देशातला सगळ्यात मोठा ब्राँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 12:18 IST

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला सुद्धा मागे सोडले आहे. विराटने देशातला सगळ्यात मोठा सेलिब्रेटी ब्राँड ...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला सुद्धा मागे सोडले आहे. विराटने देशातला सगळ्यात मोठा सेलिब्रेटी ब्राँड वैल्यूचा किताब आपल्या नावावर केला आहे. विराटची ब्राँड वैल्यू 144 मिलियन यूएस डॉलर झाली आहे.  विराटची वैल्यू वाढ मागण्याची कारणं त्याचे मैदानावरची उत्तम खेळी आणि दिवसांदिवस वाढत चाललेली तिच्या लोकप्रियता. डफ्फ एंड फेल्प्स भारत, जापान आणि दक्षिण-पूर्व एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि रीजन लीडर वरुण गुप्ताने सांगितले की जेव्हा पासून आम्ही आमची रॅकिंग प्रकाशित करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून विराट कोहलीने शाहरुख खानला रिप्लेस केले आहे. कोहली सगळ्या ब्राँडवाल्यांची पहिली चॉईस बनला आहे. शाहरुख खान दुसऱ्या नंबरवर आहे. शाहरुखची ब्राँड वैल्यू 106 मिलियन यूएस डॉलर आहे. तिसऱ्या स्थान 93 मिलियन यूएस डॉलरसह दीपिका पादुकोणने पटकावले आहे. ऑक्टोबर 2017पर्यंत कोहली 20 ब्राँड्सचा ब्राँड अॅम्बेसिडर होता. तर दीपिकाकडे 21 ब्राँड्स होते.  काही दिवसांपूर्वीच विराट अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह बंधनात अडकला आहे. त्यामुळे जाहिरात क्षेत्रात तर दोघांचीही प्रचंड मागणी असल्याने आगामी काळात हे दोघे एकत्र आल्यास त्यांची व्हॅल्यू दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत पीके, सुलतान, बँड बाजा बरात, जब तक है जान, लेडिज व्हर्सेस रिकी बहल, एनएच १०, दिल धडकन दो यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनुष्का आणि विराटची ओळख २०१३ ला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू होते. 11 नोव्हेंबरला  इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. विराटच्या बॉलिवूडमधील आणि क्रिकेट क्षेेत्रातील मित्र मैत्रिणींसाठी २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत.