viral video : जान्हवी कपूरला चाहत्यांनी घेरले, गर्दीत झाले असे कृत्य!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 17:48 IST
जान्हवी कपूर नेहमी जिममध्ये येता जाताना वा मित्रांसोबत वेळ घालवताना दिसते. पण ताजी बातमी तिच्या व्हिडिओबद्दलची आहे. सध्या जान्हवीचा एक ...
viral video : जान्हवी कपूरला चाहत्यांनी घेरले, गर्दीत झाले असे कृत्य!!
जान्हवी कपूर नेहमी जिममध्ये येता जाताना वा मित्रांसोबत वेळ घालवताना दिसते. पण ताजी बातमी तिच्या व्हिडिओबद्दलची आहे. सध्या जान्हवीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जान्हवीला काही चाहत्यांनी घेरलेय. जान्हवीच्या एका फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचाच आहे. जान्हवी एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि अचानक अनेक लहान मुलांनी तिला घेरले. ही सगळी मुले जवळच्या झोपडपट्टीची होती. यापैकी अनेकांनी जान्हवीला सेल्फीसाठी आग्रह केला. जान्हवीनेही त्यांच्याप्रती आदर दाखवत, त्यांना गोड स्माईल दिले, याचवेळी जान्हवीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्नही झाला. हे कृत्य जाणीवपूर्वक केले गेले की, गर्दीतील रेट्यामुळे झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पण ही हरकत जान्हवीला अजिबात रूचली नाही. पण संयम राखत, जान्हवीने अतिशय कुशलतेने ही स्थिती हाताळली. यानंतर जान्हवीच्या सुरक्षारक्षकांनी तिला ऐनकेनप्रकारे या गर्दीतून बाहेर काढले.गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला होता. २८ फेबु्रवारीला श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर दहाचं दिवसांत जान्हवी कामावर परतली होती. सध्या ती ‘धडक’ या आपल्या डेब्यू सिनेमात बिझी आहे. ‘धडक’हा मराठी ‘सैराट’चा रिमेक आहे. ‘सैराट’ मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट असून, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. दरम्यान, ‘सैराट’च्या हिंदी ‘धडक’ची कथा काहीशी वेगळी असून, यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत.