नशिबाचे चक्र कधी फिरेल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षी प्रयागराजच्या महाकुंभात माळा विकताना व्हायरल झालेली आणि 'इंटरनेट सेन्सेशन' ठरलेली मोनालिसा आता चक्क बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
दिग्दर्शक संजय मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मोनालिसा मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता राजकुमार राव याचा भाऊ अमित राव याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फुलणारी ही एक प्रेमकथा असून, मोनालिसाने यात एका उत्तर भारतीय मुलीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे शूटिंग इटावा, मणिपूर, नेपाळ आणि डेहराडून अशा चार टप्प्यांत पूर्ण झाले आहे.
दिग्दर्शक संजय मिश्रा यांनी मोनालिसाचा संघर्ष पाहिला होता. ते म्हणाले, "महाकुंभात सेल्फीसाठी लोक तिला कसा त्रास देत होते, हे पाहून मी अस्वस्थ झालो होतो. ती मध्य प्रदेशातील महेश्वरच्या बंजारा समाजातील असून अत्यंत निरागस आहे". सुरुवातीला केवळ सही करता येणाऱ्या मोनालिसाला इंदूर आणि मुंबईत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
दक्षिणेतही मिळाली संधीमोनालिसाच्या निरागस अभिनयामुळे तिला केवळ हिंदीच नाही, तर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम मिळाले आहे. उच्चारांच्या अडचणीमुळे काही ठिकाणी डबिंगची मदत घ्यावी लागली असली, तरी तिचा अभिनय प्रभावी असल्याचे टीमचे म्हणणे आहे.
Web Summary : Monalisa, once a Kumbh Mela vendor, stars in 'The Diary of Manipur' after going viral. The film, directed by Sanjay Mishra, explores a love story against the backdrop of Manipur's violence. Monalisa plays a North Indian girl, showcasing her journey from street vendor to actress.
Web Summary : कुंभ मेले में माला बेचने वाली मोनालिसा 'द डायरी ऑफ मणिपुर' में मुख्य भूमिका में हैं। संजय मिश्रा द्वारा निर्देशित, फिल्म मणिपुर हिंसा की पृष्ठभूमि पर एक प्रेम कहानी है। मोनालिसा एक उत्तर भारतीय लड़की की भूमिका निभा रही हैं, जो सड़क विक्रेता से अभिनेत्री बनने की अपनी यात्रा दिखाती हैं।