Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोद मेहरा यांची दुसरी पत्नी आता आहे या प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 22:05 IST

विनोद मेहरा यांच्या दुसऱ्या पत्नी बिंदीया गोस्वामी या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.

ठळक मुद्देविनोद आणि बिंदिया यांनी चार वर्षांच्या संसारानंतर वेगळे व्हायचे ठरवले. घटस्फोटानंतर एक वर्षांनी बिंदिया यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्यासोबत लग्न केले आणि अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा. बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावले होते. त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकीर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले.

 

विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रोकासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच वर्षांत बिंदिया गोस्वामी त्यांच्या आयुष्यात आल्या. बिंदीया गोस्वामी या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. जीवन ज्योती या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात केली. खट्टा मिठ्ठा, गोलमाल यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. विनोद आणि बिंदिया यांनी चार वर्षांच्या संसारानंतर वेगळे व्हायचे ठरवले. घटस्फोटानंतर एक वर्षांनी बिंदिया यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्यासोबत लग्न केले आणि अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.

बिंदिया यांनी अभिनयक्षेत्र सोडले असले तरी त्यांनी जे.पी. दत्ता यांच्या काही चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले. रिफ्यूजी, एलओसी कारगिल, उमराव जान यांसारख्या चित्रपटातील कलाकारांचे कपडे त्यांनी डिझाइन केले आहे. जे. पी दत्ता आणि बिंदिया यांनी १९८५ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.  

टॅग्स :विनोद मेहरा